Aman Gupta Dainik Gomantak
गोवा

Aman Gupta: 'तेव्हा गोव्यात भारतीयांना आदर मिळत नव्हता...', Boat च्या मालकाने सांगितली आठवण; म्हणाला, ‘दिल चाहता है’ची स्टोरीही आमचीच

Aman Gupta Goa Experience: २००० सालची आठवण सांगताना क्लब कबाना आणि बाम्बू फॉरेस्ट, हिल टॉप येथील पार्टी करत असल्याचे अमनने सांगितले.

Pramod Yadav

पणजी: बोट कंपनीचा सह – संस्थापक अमन गुप्ताने आजच्या आणि पूर्वीच्या गोव्याची तुलना करताना गोव्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. पूर्वी गोव्यात होणाऱ्या छुप्या पार्टी आणि रेव पार्टीत परदेशी पर्यटकांचे वर्चस्व होते आणि भारतीय पर्यटक दिसत देखील नव्हते, असे अमन गुप्ता म्हणाला. प्रखर गुप्ताच्या एक्सप्रिएन्स या पॉडस्कास्ट मध्ये अमन बोलत होता.

देशात कोणत्या ठिकाणी फिरायला आवडते असा प्रश्न अमन गुप्ताला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्याने जयपूर, नैनीतालसह गोवा खूप आवडत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर लहानपणापासून गोव्यात फिरण्यासाठी जात असल्याचे त्याने सांगितले.

'दिल चाहता है', सिनेमा येण्यापूर्वी पासून आम्ही मित्र गोव्यात जातोय, त्यांनी कुठून आमची स्टोरी बघितली आणि त्याचा सिनेमा केला माहिती नाही, असेही अमन गमतीने म्हणाला.

अमन गुप्ता म्हणाला, “आम्ही गोव्यात हणजूण येथे जायचो त्यावेळी तिथे इस्त्रालयच्या नागरिकांचे अधिक वर्चेस्व होते. तिथे भारतीयांना राहायला देखील जागा मिळायची नाही. गोव्यातील लोक देखील भारतीयांचा तेवढा आदर करत नव्हते. आज भारतीय पर्यटक गोव्यात इतर पर्यटकांएवढाच खर्चे करतात. त्यामुळे अलिकडे भारतीय पर्यटकांचे उत्साहाने गोव्यात स्वागत केले जाते,” असे अमन म्हणाला.

येथे पाहा पॉडकास्ट

२००० सालची आठवण सांगताना क्लब कबाना आणि बाम्बू फॉरेस्ट, हिल टॉप येथील पार्टी करत असल्याचे अमनने सांगितले. याठिकाणी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकच होते. यात आमच्या शिवाय भारतीय दिसत नव्हते, असे अमन गुप्ता म्हणाला. या पार्टीत केवळ टेक्नो संगीत वाजायचे असेही अमन गुप्ता म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT