Goa Pink Force  Dainik Gomantak
गोवा

Goa Pink Force : ‘पिंक फोर्स’ सेवेची चाके अडखळली !

चालकांची वानवा : सर्वाधिक तक्रारी पणजी, मडगाव, म्हापसा, पेडणे, डिचोलीतून

Vilas Mahadik

Pink Force : महिलांंवरील अत्याचार तसेच त्यांच्या मदतीसाठी पोलिस खात्याने स्थापन केलेल्या पिंक फोर्स पथकाला गेल्या 14 महिन्यांत 3,447 कॉल्स आले व ती सर्व प्रकरणे निकालात काढली.

पिंक फोर्स सेवा दिवस-रात्र उपलब्ध असली तरी मनुष्यबळाची बरीच कमतरता आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी 10 पैकी अर्ध्याहून अधिक पिंक फोर्स वाहने चालकांअभावी बंद ठेवण्याची वेळ येते.

पिंक फोर्समार्फत कौटुंबिक हिंसा प्रकाराला बळी पडणाऱ्या महिलांच्या समस्येच्या ठिकाणी तिला मदत केली जाते. सध्या या पिंक फोर्ससाठी 90 पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यापैकी 60 महिला तर 30 चालक आहेत.

प्रत्येक तालुक्यासाठी एक पिंक फोर्स असून प्रत्येक उपविभागीय पोलिस कार्यालयासाठी एक वाहन आहे. प्रत्येक वाहनात दोन महिला व एक चालक असतो. ही सेवा सकाळी 9 ते रात्री 9 व रात्री 9 ते सकाळी 9 अशा दोन शिफ्टमध्ये चालते.

चालकांअभावी रात्री काही वाहने ठप्प

या पिंक फोर्स पथकाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. या पथकामधील महिला पोलिसांच्याही समस्या आहेत. त्यांना दीर्घकालीन रजा मिळण्यास अडचणी येतात. कारण त्यांच्या बदली पर्यायी कर्मचारी मिळणे कठीण होते. या पथकातील महिलांना प्रशिक्षित केले आहे.

वाहने आहेत; मात्र चालकांची कमतरता असल्याने काही वाहने रात्री बंद ठेवण्यात येतात. मनुष्यबळ वाढवण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी पोलिस प्रमुखांकडे पाठवला असून त्यावरील प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पीसीआर व बिनतारी संदेशचे उपअधीक्षक राम आसरे यांनी दिली.

"एखादा अपघात झाला तर नियंत्रण कक्षातून एकाचवेळी त्याची माहिती पिंक फोर्स, पीसीआर, संबंधित पोलिस स्थानक तसेच महामार्ग गस्ती वाहनाला जाते. या सर्व वाहनांना जीपीएस असल्याने प्रत्येकाचा ठावठिकाणा कळतो. त्यामुळे जो कोणी जवळ असतो तो तेथे पोहचतो व जखमींना मदत केली जाते."

- मिरा डिसोझा, पीसीआर निरीक्षक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Anaya Bangar Viral Video: ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगरचं दमदार कमबॅक, RCB ची किट बॅग घेऊन केली प्रॅक्टिस, WPL मध्ये खेळणार?

प्रभुदेसाईंच्या आंदोलनानंतर कृषी विभागाचे आश्वासन; भातकापणीसाठी देणार नवीन यंत्र

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली, घरात कोंडलेल्या पत्नीच्या डोक्यात कट शिजला; झोपेच्या गोळ्या देऊन ओढणीने गळा आवळत पतीचा काटा काढला

SCROLL FOR NEXT