Traffic Police
Traffic PoliceDainik Gomantak

Goa Traffic Police : कारवाई 900ची पण पावती 500 रुपयांची; गोव्‍याची बदनामी

जास्‍त पैसे घेऊन पावती दिली जाते कमी रकमेची
Published on

दक्षिण गोव्यात वाहतूक पोलिसांकडून पर्यटकांची लुबाडणूक करण्यात येत असल्याची तक्रार कोल्हापूर-महाराष्ट्र येथील एका पर्यटकाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्‍याला 900 रुपयांचा तालांव देण्‍यात आला, मात्र त्‍याच्‍या हातात केवळ 500 रुपयांची पावती देण्‍यात आली, अशी कैफियत त्‍याने मांडली.

Traffic Police
Maan Ki Baat: ख्रिसमसमध्ये गोव्यापेक्षा... मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

सदर प्रकरण दि. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्‍या सुमारास घडल होते. हा पर्यटक युवक आपली दुचाकी घेऊन कोलवा येथून बेताळभाटीच्‍या दिशेने जात होता. यादरम्यान वाहतूक पोलिसांनी त्याला अडवून कागदपत्रांची मागणी केली.

विम्‍याचे दस्‍तावेज नसल्याच्या कारणाने त्‍याला 1500 रुपयांचा दंड भरण्याबाबत सांगण्यात आले. नंतर झालेल्या तडजोडीत 900 रुपये भरण्याचे संमत झाले. दंडाची पावती फेडतेवेळी दुचाकीस्वाराकडून 900 रुपये घेण्यात आले आणि त्याच्या हातात केवळ 500 रुपयांची पावती सोपविण्यात आली.

अशा प्रकारे कोलवा वाहतूक पोलिसांकडून पर्यटकांना लुबाडण्‍यात येत आहे. 400 रुपये पावतीतून गायब झाले, मात्र ते गेले कोठे गेले, या त्‍या पोलिसांनाच माहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com