Tillari Canal  Dainik Gomantak
गोवा

Tillari Dam: तिळारी कालव्याचे काम पूर्ण! पर्वरीची तहान भागणार; जलप्रकल्पाची टाकी भरण्याकडे लक्ष

Goa Water Crisis: कुडासे-धनगरवाडी (दोडामार्ग) येथे फुटलेल्या तिळारी कालव्याचे काम पूर्ण झाल्याने सोमवारी दुपारी कालव्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Sameer Panditrao

Tillari Dam Porvorim Water Supply

पणजी: गेला आठवडाभर तहानलेल्या पर्वरीला तहान आता बुधवारी सकाळपासून सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. तिळारीच्या डाव्या कालव्यातून गोव्याच्या दिशेने आज सोमवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आले.

महाराष्ट्राचे जलसंपदा कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, कुडासे-धनगरवाडी (दोडामार्ग) येथे फुटलेल्या तिळारी कालव्याचे काम पूर्ण झाल्याने सोमवारी दुपारी कालव्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. गोव्याचे जलसंपदा मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केल्यानंतर दहा क्यूमॅक्स (घनमीटर प्रतिसेकंद) दराने पाणी सोडण्यात आले आहे.

कालव्‍याला भगदाड पडण्‍याची घटना मागील आठवड्यात घडली होती. फुटलेल्या ठिकाणी मोरी होती. त्या मोरीचे खचलेले पाईप बाहेर काढून नव्याने पाईप टाकण्यात आले. तसेच काँक्रीट करून मजबूत करण्यात आले. भिंतीला भगदाड पडून वाहून गेलेला मातीचा भराव पुन्हा भरून दोन्ही बाजूंनी काँक्रीटीकरण करण्यात आले असून त्‍यावर एलडीपी फिल्म प्लॅस्टिक पसरविण्यात आले आहे.

दरम्‍यान, जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्‍ट्राच्‍या हद्दीतील तिळारी कालव्‍यांचे काम ४०० कोटी रुपये खर्चून महाराष्‍ट्र सरकार करणार आहे. त्‍याबाबत ते सरकार दोन महिन्‍यांत निर्णय घेईल. त्‍यानंतर ते काम याच हंगामात सुरू करण्‍याचा प्रयत्‍न असेल.

१० हजार घनमीटर क्षमतेची टाकी पूर्ण भरणे गरजेचे

पर्वरी येथील १५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलप्रकल्पाची साठवणूक टाकी १० हजार घनमीटर क्षमतेची आहे. ती पूर्ण भरल्याशिवाय प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार नाही. तिळारीचे पाणी सुरळीतपणे पर्वरीत पोहोचल्यावर टाकी भरण्यासाठी चार तास लागतील. त्यानंतर शुद्धीकरणासाठी आणखी सहा तास लागतील. त्‍यामुळे बुधवारी सकाळीच पर्वरीत पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता निवृत्ती पार्सेकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

पाहणी करून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्‍यात आला. उद्या मंगळवारी सायंकाळपर्यंत पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत हे पाणी पोहोचेल. आता तिळारीतून पाणीपुरवठा सुरू झाल्याने बार्देशची तहान भागवणे शक्य होणार आहे.
प्रमोद बदामी (मुख्य अभियंता, जलसंपदा खाते गोवा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT