tilari dam goa Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023 : तिळारीतून विसर्ग सुरू; बैलपार नदीकाठच्या बागायतींमध्ये शिरले पाणी

तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Tillari dam water released : मुसळधार पावसाने अविश्रांतपणे सुरू केलेल्या अखंड बरसातीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तिलारी धरणातील पाणी साठ्याने सांडवा पातळी गाठल्याने अखेर शनिवारी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

तिलारी नदीत सांडव्यातून पाणी बाहेर पडत असल्याने तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यासाठी राज्य सरकारने आपत्कालीन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नदीकाठच्या काही गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

शनिवारी धरणाची सांडवा माथा पातळी 106.70 मी. इतकी भरल्याने सांडव्यावरून नदीमध्ये धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. याबाबत शुक्रवारीच नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

तसेच नदीकाठच्या सर्व संबंधित गावांमध्ये या कार्यालयामार्फत शुक्रवारी रात्री सायरन वाजवून इशाराही देण्यात आला आहे.

बैलपार नदीला उधाण : बागायतीत शिरले पाणी

संततधार पाऊस आणि त्यातच सकाळी तिळारी धरणातून पाणी सोडल्यामुळे पेडणे तालुक्यातील शापोरा-तेरेखोल बैलपार नदीला पुराचे स्वरूप आले आहे. परिसरातील शेती बागायती पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच आपत्कालीन सेवा सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. गावचे तलाठी, सरपंच एकमेकांच्या संपर्कात असून लोकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. बैलपार नदी परिसरातील शेती-बागायती अर्धी अधिक पाण्याखाली गेली. रात्री पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

गावणे धरणही ओव्हरफ्लो

मुसळधार पावसामुळे काणकोण येथील गावणे लघुपाटबंधारे प्रकल्पही ओसंडून वाहू लागला आहे. याआधी राज्यातील साळावली, पंचवाडी ही धरणे भरली आहेत. त्यातच आता गावणे धरण भरून वाहू लागले आहे. तर आमठाणे धरण भरण्याच्या मार्गावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT