kadamba plateau bypass accident : कदंब पठार महामार्गावर दुचाकी व कारमध्ये आज अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कदंब पठारावरील बायपास रस्त्यावर साईबाबा मंदिरानजीक दुचाकी व कारमध्ये धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक व अन्य एक असे दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
कारला दुचाकीने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तर कारच्या मागील भागाचे नुकसान झाले आहे.
कदंब पठारावरील राष्ट्रीय महामार्ग हा सहापदरी झाल्यापासून तेथून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्ग रुंद तसेच खड्डेमुक्त असल्याने वाहनांची गती बेफाम असते. वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना मात्र जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.
तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळ्या लेन दिल्या आहेत. मात्र, वाहनचालक लेनची शिस्त पाळत नसल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.