Tillari Dam Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: 'तिळारी' नियंत्रणात; शापोरा नदीकाठी धोका कायम

कालपर्यंत या तिळारी धरणातील (Tillari Dam) पाण्याची पातळी क्षमतेपेक्षा साधारण एक मीटर खाली होती.

दैनिक गोमन्तक

डिचोली: पावसाने रौद्रावतार (Heavy Rain) तिळारी धारण (Tillari Dam) केला असला, तरी महाराष्ट्रातील तिळारी धरणातील पाण्याची पातळी मंगळवारी सायंकाळपर्यंत नियंत्रणात होती. अशी माहिती मिळाली आहे. मुसळधार पावसामुळे साळ गावातून वाहणाऱ्या शापोरा नदीच्या (Chapora River) पाण्याची पातळी वाढून ही नदी तुडूंब भरल्याने 'तिळारी'तून जलविसर्ग सुरु झाला की काय, अशी भिती शापोरा नदीकाठच्या जनतेत पसरलेली आहे. मात्र, तिळारी धरणातील पाणी नियंत्रणात असून, तूर्त धरणातून जलनिसर्गाचा धोका नसल्याची माहिती धरण प्रकल्प सूत्रांकडून मिळाली आहे. (Tillari dam under control but danger looms along Shapora river)

कालपर्यंत या धरणातील पाण्याची पातळी क्षमतेपेक्षा साधारण एक मीटर खाली होती. आणखी दोन ते तीन दिवस संततधार आणि जोरदार पाऊस पडला, तरच जलविसर्ग होण्याची संभावना वर्तविण्यात आली आहे.

मागील महिन्यात 22 तारखेला 'तिळारी'तील पाण्याने शिखर स्तर गाठल्यानंतर पाणी बाहेर गोव्याच्या दिशेने वाहणाऱ्या शापोरा नदीत वाहू लागले होते. जलनिसर्गाचा धोका ओळखून धरणातील अतिरिक्त पाणी बाहेर सोडण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे त्यावेळी शापोरा नदीकाठच्या जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दिवसांनी परिस्थिती नियंत्रणात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

Goa Assembly Live: जपान आणि अमेरिकेच्या काही भागात स्थलांतराचा इशारा

Illegal Liquor Goa: सासष्‍टीत सर्वाधिक बेकायदा दारू धंदा! 5 वर्षांत 1395 प्रकरणे नोंद; नव्‍याने 2365 परवाने

SCROLL FOR NEXT