Goa: सालेलीत धबधब्यावर हुल्लडबाजी सुरूच

कोरोना महामारीच्‍या (Covid 19) पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्‍हणून सालेली ग्रामस्‍थांनी पर्यटकांना धबधब्‍यावर (Waterfall) येण्‍यास बंदी घातली आहे.
symbolic  Waterfall
symbolic Waterfall Dainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: राज्यात सध्‍या पावसाने (Heavy Rain) जोर धरला आहे. त्यामुळे सत्तरी (Sattari) तालुक्यातील निसर्गसौंदर्य सर्वांचे आकर्षण ठरत आहे. त्यात धो धो कोसळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालीत आहेत. कोरोना महामारीच्या (Covid19) पार्श्‍वभूमीवर सत्तरी तालुक्यातील धबधब्‍यांवर (Waterfall) जाण्‍यास निर्बंध असतानाही शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी बरेच शहरी भागातील पर्यटक येत असतात. हे पर्यटक दारूच्या नशेत हुल्लडबाजी करीत असतात. त्‍यातील काहीजण सालेलीतील धबधब्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दारूच्या बाटल्‍याही फोडतात. (Tourists are making a fuss over the Saleli waterfall in Goa)

सालेली गावातील धबधब्यावर जाण्यास गावकऱ्यांनी पूर्णपणे निर्बंध घातले असतानाही शहरांतील पर्यटकाबरोबरच आजूबाजूच्या गावातील काही तरुण-तरुणी धबधब्यावर भिजण्‍याचा आनंद घेताना दिसतात. धबधब्‍यावर जाण्‍यास निर्बंध असतानाही हे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करून, पर्यटकांना गावात न येण्याचा इशारा देणारे फलक पुन्‍हा लावण्यात आले आहेत.

यापूर्वी गावातील जागरूक नागरिकांनी धबधब्यावर जाणाऱ्या मार्गावर काटेरी कुंपण उभारून पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास मज्जाव केला होता, परंतु काहीजण आडवाटेने धबधब्यावर जाऊन दारूच्या नशेत हुल्लडबाजी करीत असतात. त्‍यामुळे गावातील काही भागात फुटलेल्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन धबधब्यावर जाण्यास बंदी असल्याचे फलक बऱ्याच ठिकाणी लावण्यात आले आहेत.

पोलिसांनी कारवाई करण्‍याची गरज

कोरोना महामारीच्‍या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्‍हणून सालेली ग्रामस्‍थांनी पर्यटकांना धबधब्‍यावर येण्‍यास बंदी घातली आहे. तरीही अनेक उत्‍साही पर्यटक धबधब्‍यावर येऊन मौजमजा करत असल्‍याचे दिसून येते. वाळपई पोलिसांनी या प्रकाराची दखल घेऊन येथे येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com