Goa G-20 Summit  Dainik Gomantak
गोवा

Goa G20 Summit: गोव्यातील G20 बैठकीसाठी चोख सुरक्षाव्यवस्था; 'या' दिवशी पहिली बैठक

आरोग्य यंत्रणाही हाय अलर्टवर

Akshay Nirmale

Goa G20 Summit: गोव्यात होणाऱ्या G20 बैठकीच्या पहिल्या बैठकीला अवघे काही आठवडे शिल्लक असताना, आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळांच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. येत्या काही दिवसांत सर्व सुरक्षा एजन्सींसोबत संयुक्त सुरक्षा आढावा बैठक घेण्यात येणार असून, 13 एप्रिल रोजी या बैठकीशी संबंधित सर्व घटकांसोबत अंतिम बैठक होणार आहे.

G20 परिषदेसाठीचे राज्याचे शिष्टाचार सचिव आणि नोडल ऑफिसर संजीत रॉड्रिग्स यांनी सांगितले की, गोव्यात, विमानतळांपासून ते G20 बैठकीच्या आयोजन स्थळापर्यंतच्या सर्व मार्गावर प्रत्येक ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था केली जात आहे.

हिरवळीद्वारे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण केले जात आहे. प्रतिनिधींना भोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आरामदायी अनुभव देण्याचा प्रयत्न आहे.

सुरक्षेच्या आघाडीवर, पोलीस महासंचालक जसपाल सिंग म्हणाले की, गोवा पोलीस आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या मुक्कामादरम्यान सर्व सुरक्षा उपायांचे पालन करतील.

पोलिस महानिरीक्षक आणि G20 चे संरक्षण नोडल अधिकारी ओमवीर सिंग बिश्नोई यांनी सांगितले की, नियोजित बैठकीपूर्वी सर्व सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित केली जाईल. दोन्ही विमानतळांसाठी एक वेन्यू कमांडर आणि दोन अधिकारी नियुक्त केले आहेत.

सर्व प्रतिनिधींना वैद्यकीय कव्हरेज दिले जाईल. बैठकीच्या सर्व ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात केली जातील.

दरम्यान, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा उपयोग शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय आणीबाणीसाठी केला जाईल. यासाठी आयसीयू सुविधा असलेला कक्षही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT