गोवा

Tigers In Goa Forest: गोव्याच्या जंगलात 'वाघ' वाढणार; सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होणार बळकट

Tigers In Goa Forest: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची हद्द पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांपर्यंत पसरली.

गोमन्तक डिजिटल टीम

Tigers In Goa Forest

राज्याच्या जंगलात आढळणारे वाघ कुठले, हा वाद सुटत नसतानाच आता वाघांची संख्या आणखीन वाढणार आहे. याला राज्य सरकारचा नव्हे तर महाराष्ट्र सरकारचा निर्णय कारणीभूत ठरणार आहे. ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वाघांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे स्थलांतर करणार आहेत.

राज्यात व्याघ्र प्रकल्प करण्याविषयी सरकारची अनास्था असतानाच आता गोव्यातील जंगलांत विशेषतः सह्याद्रीच्या पर्वत रांगांत असलेल्या जंगलात वाघांचा वावर वाढणार आहे.

यापूर्वी जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यांत वाघ टिपले गेले असूनही ते राज्याबाहेरील वाघ आहेत, अशी भूमिका वन खात्याने आजवर घेतली आहे. व्याघ्र प्रकल्प करा, या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून तेथे तो खटला प्रलंबित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची सुरवात जानेवारी २०१० मध्ये झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांपर्यंत त्यांची हद्द पसरली. त्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो.

हा भाग राखीव अभयारण्य केल्यानंतरही वाघांची संख्या वाढली नाही; कारण प्रजनन करणाऱ्या वाघांनी राखीव भागात वसाहत केली नाही. त्या भागात वाघांच्या पद मार्गाच्या पुराव्याने सात ते आठ वाघांचा वावर आढळला आहे.

गोव्यातही तेवढेच वाघ जंगलातील कॅमेऱ्यांत सापडले होते. हा टापू कर्नाटकातील भीमगड अभयारण्य ते काळी व्याघ्र प्रकल्पापर्यंत पसरला असल्याने दोन्हीकडचे वाघ गोव्यात येत जात असावेत, अशी शक्यता आहे.

'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' होणार बळकट

निसर्ग अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी याबाबत सांगितले की, सह्याद्री-कोकण कॉरिडॉर किंवा सह्याद्री-राधानगरी- गोवा-कर्नाटक कॉरिडॉर उत्तर पश्चिम घाटातील वाघांच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण आहे.

- हा कॉरिडॉर कर्नाटकातील काळी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राला गोव्याच्या मध्यभागी असलेल्या जंगलांना जोडतो, ज्यामुळे राधानगरी वन्यजीव अभयारण्य, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवर्धन राखीव जागा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या प्रदेशात वाघ जोडले जातात.

- आता विदर्भातील वाघ कोकणात आणले जणार ही निसर्गप्रेमींसाठी खुशखबर आहे. हे वाघ गोव्यातही येऊन जातील. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या मागणीला बळकटीच मिळेल. काळी व्याघ्र प्रकल्पातील वाघ नियमितपणे गोव्याकडे जातात आणि जेथे शिकार कमी आहे.

- गोव्याच्या संरक्षित भागात आता सात ते आठ वाघ आहेत. मात्र, राज्याच्या वन खात्याने व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याच्या मागणीला विरोध केला आहे. खरे तर हे कॉरिडॉर केवळ वन्यजीवांसाठीच नाही तर गोवा आणि कर्नाटकमधील या जंगलांच्या आसपास राहणाऱ्या समुदायांच्या जलसुरक्षेसाठी देखील महत्त्वाचे आहेत. हे महत्त्वाचे पाणलोट क्षेत्र आहे. येथे वाघांचीही पूजा केली जाते.

'कॉरिडॉर' : वन्यजीवांना जपणारा घटक

1) कॉरिडॉर हे मूलतः निवासस्थान आणि मार्ग यामधील दुवा असतात, जे वन्यजीव लोकसंख्येला जोडतात आणि वाढवतात, जे मानवी वसाहती आणि पायाभूत सुविधांच्या कामांमुळे विखुरलेले आहेत. वाघांच्या लोकसंख्येच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी ते महत्त्वपूर्ण आहे; कारण ते वन्यजीवांना संरक्षण करण्यास मदत करतात.

2) वाघ आपल्या क्षेत्रात इतर कोणाला येऊ देत नाहीत. तसेच अनेकदा ते २ वाघ आप व अन्नाच्या शोधात लांबचा प्रवास करतात. असे करीत असताना ते वन्यजीव कॉरिडॉरचा वापर करतात व अनेक मानवी भागातून प्रवास करतात.

3) कॉरिडॉरने संवर्धनामध्ये बजावलेली भूमिका महत्त्वाची असून, ती धोरणात्मक निर्णयांमध्येदेखील समाविष्ट केली गेली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेने देशातील ३२ प्रमुख व्याघ्र कॉरिडॉरवर नजर ठेवली आहे, त्यात गोव्याला जोडणाऱ्या कॉरिडॉरचाही समावेश आहे.

Edited By - अवित बगळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT