Tiatrist Francis the Tuem Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : ‘म्हादई’प्रश्‍नी फ्रान्सिस द तुयेची सरकारवर ‘कांतारा’तून तोफ

आंदोलनात उतरण्याचा तियात्रिस्ताचा निर्धार, साहित्यिकांत सामसूम

सुशांत कुंकळयेकर

Tiatrist Francis the Tuem : म्हादई आंदोलनात पूर्णतः सक्रीय असलेले तियात्रिस्त फ्रान्सिस द तुये यांनी विर्डी येथे झालेल्या सभेत ''म्हादय आमची माय'' हे ‘कांतार’ म्हणून लोकांचे लक्ष या प्रश्नाकडे ओडण्याचा प्रयत्न केला होता.

आता पुन्हा त्यांनी लॉरी त्रावासो यांच्या ''सोपनातली फुला'' या तियात्रात गोव्यातील तसेच केंद्रातील भाजप सरकार या प्रश्नांवर कसे दुटप्पीपणे वागते, त्यावर आपल्या अनोख्या शैलीत टीका करण्यास सुरूवात केली आहे.

आज मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये झालेल्या या तियात्राच्या प्रयोगात त्यांनी आपल्या कांतारातून दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्र सरकार म्हादई वाचविणार असे सांगत असताना अमित शहा बेळगावात वेगळीच भाषा कशी बोलतात? यावर भाष्य केले.

पॉलिटिकल कांतारासाठी प्रसिद्ध असलेल्या तुये यांच्या या कांतारासाठीही यावेळी वन्स मोअर मिळाला.

म्हादईबाबत तियात्रिस्त आघाडीवर असले तरी अजून साहित्यिकांच्या मंचावर तशी सामसूमच दिसते. काही मोजके साहित्यिक सोडल्यास इतरांनी आपली या प्रश्नांवरील भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. ही खंत कोकणी कवी प्रकाश नाईक यांनीच बोलून दाखविली.

जनमत कौल असो किंवा राजभाषा आंदोलन, यावेळी साहित्यिक जसे पोटतिडकीने आंदोलनात उतरले होते, तसे चित्र यावेळी दिसत नाही. राजकीय कारणामुळे साहित्यिकही विभागून गेले आहेत, असेच वाटते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र हा मुद्दा खोडून काढताना ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो म्हणाले, आता पर्यंत म्हादई आंदोलनात प्रत्येकवेळी साहित्यिकांनी आपले योगदान दिले आहे.

आताही ते देत आहेत. ओपिनियन पोल आणि राजभाषा आंदोलनाच्यावेळी विरोधही तेवढाच प्रखर असल्याने साहित्यिकांकडून तीव्रतेने त्याला उत्तरे यायची आता सरकारही आपण म्हादईसाठीच वावरते, अशी भूमिका घेत असल्याने दुसऱ्या बाजूने जी विरोधाची तीव्रता असायला हवी होती, तशी ती दिसत नाही, असे ते म्हणाले.

तियात्रिस्त एकत्र

गोवा नॉन स्टॉप तियात्रिस्त संघटनेचे अध्यक्ष आर्णाल्ड कॉस्ता यांनी यासंबंधी ''गोमन्तक''शी बोलताना, म्हादई प्रश्नांवर सर्व तियात्रिस्त एकत्र असून आम्ही या प्रश्नावर या दुटप्पी भूमिका घेणाऱ्या सरकारला उघडे पाडण्यास सज्ज झालो आहोत, असे सांगितले.

सध्या लेंत महिना असल्यामुळे तियात्र पूर्ण जोमाने सुरू झालेले नाहीत. ईस्टरनंतर ते पूर्ण क्षमतेने रंगमंचावर येणार त्यावेळी प्रत्येक तियात्रात निदान एक तरी म्हादईवर कांतार निश्चितच असेल. ज्येष्ठ तियातत्रिस्त रोजफर्नस् याचा आता येणाऱ्या ''हे ओशेच चोलतोले? या नव्या तियात्रातही म्हादईवर भाष्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT