पाय तियात्रिस्टाच्या तसबिरिला फुले अर्पण करताना रविंद्र भवन मडगावचे अध्यक्ष दामू नाईक, सदस्य सचिव संध्या कामत, तियात्रिस्ट शर्मिला फर्नांडिस, कोनी एम व मान्यवर. 
गोवा

Goa: मडगाव येथील 'रविंद्र भवन' तियात्र सादरीकरणासाठी खुले

(Goa) पाय तियात्रिस्टाच्या 74व्या पुण्यतिथी दिनी दामू नाईक यांची घोषणा

Mangesh Borkar

फातोर्डा: गेले सुमारे दीड वर्ष कोविड (Covid 19) महामारीमुळे तियात्र (Tiatr Academy of Goa) सादरीकरणासाठी बंद असलेले मडगावच्या (Madgaon) 'रविंद्र भवनचे' मुख्य सभागृह आजपासुन खुले करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष दामू नाईक यांनी आज केली. पाय तियात्रिस्ट उर्फ जुवांव आगुस्तिन फर्नांडिस यांच्या 74व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

50 टक्के उपस्थिती

सद्या कोविडचा धोका पुर्णपणे टळला नसला तरी 50 टक्के उपस्थितीच्या नियमानुसार सिनेमागृहे सुरु करण्यात आली आहेत. रविंद्र भवनामध्ये सर्व सरकारी नियम पाळुन व काळजी घेऊनच तियात्रांसाठी सभागृह खुले केल्याचे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.

पाय तियात्रिस्ट हे तियात्रांचे जनक होत. त्यांच्यामुळे तियात्राचे स्वरुप बदलले व एक या क्षेत्रांमध्य़े नवीन क्रांती सुरु झाली. तियात्र हे जरी मनोरंजनाचे साधन असले तरी तियात्रामुळे समाजप्रबोधनाचे काम होत असते शिवाय कोकणी भाषा व गोंयकारपण टिकवुन ठेवण्यासाठी  व कला क्षेत्रात नवा आयाम तयार होण्यासाठी तियात्र माध्यमाने भरीव योगदान दिल्याचे नाईक म्हणाले.

सुरुवातीला समई प्रज्वलीत करुन व पाय तियात्रिस्टांच्या तसबिरिला फुले वाहण्यात आली. तियात्रिस्ट व रविंद्र भवनचे सदस्य कोनी एम यानी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला सदस्य सचिव संध्या कामत, अधिकारी पुनम बुधोलकर, सदस्य अनिल रायकर, तियात्रिस्ट शर्मिला फर्नांडिस व मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT