Goa: सारमानस धक्क्यानजीक फेरीबोटीतून पडल्याने एकजण बुडाला

नदीत बुडाल्याने दुर्दैवी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, सारमानस फेरीधक्क्यापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे.
 टोंक-सारमानस (Tonk-sarmanas) जलमार्गावरील फेरीबोटीतून (Ferryboat) प्रवास करणारा ज्येष्ठ नागरिक मांडवी नदीत (Mandvi river) बुडाल्याची (Drowned) घटना घडली आहे.
टोंक-सारमानस (Tonk-sarmanas) जलमार्गावरील फेरीबोटीतून (Ferryboat) प्रवास करणारा ज्येष्ठ नागरिक मांडवी नदीत (Mandvi river) बुडाल्याची (Drowned) घटना घडली आहे. Dainik Gomantak

डिचोली: टोंक-सारमानस (Tonk-sarmanas) जलमार्गावरील फेरीबोटीतून (Ferryboat) प्रवास करणारा ज्येष्ठ नागरिक मांडवी नदीत (Mandvi river) बुडाल्याची (Drowned) घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी सारमानस फेरीधक्क्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. नामदेव फडते गावकर (वय-70) असे नदीत बुडाल्याने दुर्दैवी ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून, ते अडकोण-बाणस्तारी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. सारमानस फेरीधक्क्यापासून फेरीबोट काही अंतरावर असताना नामदेव फडते गावकर हे अचानक नदीत पडले आणि बेपत्ता झाले. उतरण्याच्या घाईगडबडीत की अन्य कारणामुळे ते पाण्यात पडले, ते समजू शकले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेताना रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या नामदेव फडते गावकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. नंतर शोधमोहीम थांबाविण्यात आली.

 टोंक-सारमानस (Tonk-sarmanas) जलमार्गावरील फेरीबोटीतून (Ferryboat) प्रवास करणारा ज्येष्ठ नागरिक मांडवी नदीत (Mandvi river) बुडाल्याची (Drowned) घटना घडली आहे.
Goa: ज्येष्ठ पत्रकार विशाल कळंगुटकर यांचे अपघातात निधन

यासंबधीची माहिती अशी की, नामदेव फडते गावकर हे टोंक येथून फेरीबोटीतून सारमानसला येत होते. सारमानस फेरीधक्क्यावर त्यांचे एक सहकारी वाट पाहत थांबले होते. दोघेही मिळून अध्यात्मिक कार्यक्रमाला जाणार होते. अशी माहिती मिळाली आहे. नामदेव हे अचानक नदीत बुडाल्यानंतर फेरीबोटीतील इतर प्रवाशांनी आरडाओरड केली, तेव्हा फेरीबोट मागे घेण्यात आली. तोपर्यंत नामदेव हे पाण्यात गायब झाले.

डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी बेपत्ता नामदेवचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com