Goa: ज्येष्ठ पत्रकार विशाल कळंगुटकर यांचे अपघातात निधन

दुचाकीवरुन नानोडा येथे जात असता, रस्त्यावर ठाण मांडलेल्या गुरांवर त्यांच्या दुचाकीची धडक बसली. त्यात विशाल यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली.
ज्येष्ठ पत्रकार विशाल कळंगुटकर यांचे अपघातात निधन
ज्येष्ठ पत्रकार विशाल कळंगुटकर यांचे अपघातात निधनDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: ज्येष्ठ पत्रकार (Senior journalist) तथा दै. "गोमन्तक"चे (Gomantak) अस्नोडा प्रतिनिधी विशाल कळंगुटकर (Vishal Kalangutkar) (वय-67) यांचे शनिवारी सायंकाळी नानोडा येथे दुर्दैवीरित्या अपघातात (accident) निधन झाले. मयत विशाल हे डिचोली तालुक्यातील नानोडा गावचे रहिवासी होते. दुचाकीवरुन नानोडा येथे जात असता, रस्त्यावर ठाण मांडलेल्या गुरांवर त्यांच्या दुचाकीची धडक बसली. त्यात विशाल यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला.अपघाताची माहिती मिळताच त्याठिकाणी असलेल्या लोकांनी धावपळ करून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णवाहिकेतून डिचोली इस्पितळात आणले असता, त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार विशाल कळंगुटकर यांचे अपघातात निधन
Goa Crime: युवतीला ढकलल्या प्रकरणी फोंड्यातील युवकाला अटक

विशाल हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत होते. विविध वर्तमान पत्रातून बातमीदार म्हणून कार्य करीत होते. गोमंतरंग हे साप्ताहिक त्यांनी सुरु केले होते. नानोडा देवस्थानातही ते अनेक वर्षे कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र व एक कन्या, सून आणि नातू असा परिवार आहे. डिचोली पोलिसांनी

अपघाताचा पंचनामा केला असून,मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकोत पाठवण्यात आला आहे. डिचोलीचे पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. विशाल यांच्या अपघाती निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com