Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Sangolda: जादा बिलावरून रेस्टॉरंट मालकाला शिवीगाळ, तीन वाहतूक पोलिस निलंबित

गोमन्तक डिजिटल टीम

जादा बिलावरून रेस्टॉरंट मालकाशी वाद घालून शिवीगाळ केली, याप्रकरणी तीन वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सांगोल्डा येथील रेस्टॉरंट मध्ये ही घटना घडली. एकूण आठ पोलिस कर्मचारी तेथे पार्टीला गेले होते अशी माहिती समोर आली. दरम्यान, इतरांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडमध्ये नोकरीचे आमिष देत ५.२३ लाखांची फसवणूक

न्यूझीलंडमधील ग्रँटवूड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीत नोकरीचे आमिष देत ५.२३ लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकिस आले आहे. सासष्टीमध्ये ही घटना घडली आहे. सायबर क्राईम विभागाने ७८३६०२५६१० या मोबाईल वापरकर्ता आणि upeevski@gcsd.ge आणि admin@grantwoodcontracting-nzo.com या ई-मेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रॉलर मालकाल १.२४ कोटी रूपयांचा गंडा

एका ट्रॉलर मालकाची मासळी खरेदीच्या नावाखाली १.२४ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली आहे. संशयित आरोपी मालिम जेटी वरून उडपी येथे मासळी घेऊन जात होते असा संशय आहे. दरम्यान, मोहम्मद हफिम आणि एम युसूफ (रा. उडपी, कर्नाटक) यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi Crime: 'ती' आत्महत्या कौटुंबिक कारणामुळेच? मोती तलावात उडी घेणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह 17 तासांनी सापडला

Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगले; व्हेनेझुएलाच्या मारिया मचादो यांना मिळाला नोबेल शांतता पुरस्कार

Yashasvi Jaiswal Century: शतक पूर्ण... सेलिब्रेशन व्हायरल! यशस्वी जयस्वालने 'ती' फ्लायिंग किस कोणासाठी दिली? Watch Video

IPL Auction: काऊंटडाऊन सुरु! आयपीएल 2026 लिलावाची तारीख ठरली! रिटेन्शनची डेडलाईनही जाहीर

Finasteride Side Effects: टक्कल उपचाराच्या नादात 'मृत्यू'ला आमंत्रण, 'हे' औषध ठरू शकतं जीवघेणं! संशोधनात उघड झालं धक्कादायक सत्य

SCROLL FOR NEXT