Beach shack license validity increased by one year
Beach shack license validity increased by one yearDainik Gomantak

Beach Shack License: बीच शॅक परवाना वैधता एका वर्षांनी वाढवली

Published on

गोवा सरकारने (Goa Govt) बीच शॅक परवाना वैधता एक वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. (Beach shack license validity increased by one year) कोरोना काळात झालेलं नुकसान लक्षात घेता सरकारने परवाना वैधता वाढवली आहे. यामुळे शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी एका इंग्रजी वर्तमान पत्राला याबाबत माहिती दिली आहे.

Beach shack license validity increased by one year
पारंपरिक मासेमारी सुरू; करंजाळे समुद्र मच्छीमारांना बंपर कॅच

शाक व्यावसायिकांना कोरोना काळात मोठं आर्थिक नुकसान झाले. मार्च २०२० पासून देशात कोरोनाचा शिरकाव झाला. याचा गोव्यातील पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याने शॅक व्यावसायिक परवाना वैधता एक वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. शाक व्यावसायिकांनी दोन वर्षांची वैधतेची मागणी केली होती. पण आम्ही एक वर्ष अवधी वाढवला आहे. तसेच, आगामी हंगामासाठी नवे परवाने दिले जाणार नाहीत. असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाक धारकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तिसऱ्या लाटेची शक्यता कमी झाल्यानंतर पर्यटनात वाढ होत होती. तर सक्तीने शॅक हटवायला लावले. प्रसिद्ध कलंगुट, बागा, कोलवा यासारख्या चांगला शॅक व्यवसाय होतो पण, स्थानिक पर्यटकांमुळे त्याला फटका बसतो. शॅक व्यावसायिकांची परिस्थिती चांगली नसल्याचे मत व्यावसायिकांनी नोंदवले आहे.

Beach shack license validity increased by one year
मासेमारीसाठी एलईडी लाईट्स वापरणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com