Gomeco Dainik Gomantak
गोवा

गोमेकॉत लवकरच सुरु होणार तीन नवे अभ्यासक्रम: विश्‍वजीत राणे

राज्यातील (Goa) नागरिकांना चांगल्यात चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (Gomeco) इस्‍पितळात नवनवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातील (Goa) नागरिकांना चांगल्यात चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (Gomeco) इस्‍पितळात नवनवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता करण्यात येत आहे. गोमेकॉ देशातील एक नामवंत इस्पितळ बनावे यासाठी आपले सतत प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात गोमेकॉमध्ये जेरेयाट्रिक एमडी कोर्स तसेच एमसीएच व डीएम अभ्यासक्रम (कोर्स) सुरू केले जाणार आहेत, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे (Health Minister Vishwajeet Rane) यांनी शुक्रवारी केले. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या इस्‍पितळात अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता करून विकसीत केलेल्या नव्या जेरेयाट्रिक व पोस्‍ट कोविड वॉर्डचे उद्‍घाटन केल्यानंतर आरोग्य मंत्री राणे बोलत होते. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. उदय काकोडकर (Dr. Uday Kakodkar), डॉ. संदीप सरदेसाई (Dr. Sandeep Sardesai), प्रा. एडवीन गोम्स, डॉ. तिवारी आदी डॉक्टर उपस्थित होते.

राज्यात सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. दर दिवशी १२ ते १६ हजार लोक कोरोना प्रतिबंधक लस घेत आहेत. लसीचा पहिला डोस जवळ जवळ पूर्ण झाला असून, सध्या दुसरा डोस दिला जात आहे. तो महिनाभरात पूर्ण होऊन राज्यात दोन्ही डोसांचे लसीकरण पूर्ण होईल.

इतर ठिकाणीही सोयीसुविधा

राज्यातील लोकांवरील उपचारांची गरज लक्षात घेऊन गोमेकॉ इस्‍पितळात नव्या वॉर्डची निर्मिती करतानाच राज्यभरातील इस्पितळांचा दर्जा उंचावण्यासाठीही आणि तेथे चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य खात्याचे सतत प्रयत्न सुरू असतात. राज्यातील लोकांना आरोग्याबाबत कोणत्याही सुविधांची कमतरता भासू नये यासाठी सतत बैठका व चर्चा करून योग्‍य त्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. आरोग्य खात्याचे डॉक्टर व इतर सर्व कर्मचारी गेले दीड वर्ष बरीच मेहनत घेत असल्यानेच गोव्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे आरोग्‍य मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT