Three kings Feast|Goa 
गोवा

Three kings Feast: रेमेद सायबिणीचे अर्ध्या दिवसाचे फेस्त मोठ्या उत्साहात साजरे

Goa: ख्रिश्‍चन बांधवांप्रमाणे हिंदूंची पण रेमेद सायबिणीवर श्रद्धा आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: तीनशे वर्षांची परंपरा असणाऱ्या कासावलीच्या डोंगरमाथ्यावरील निर्जनस्थळी रेमेद सायबिणीचे फेस्त शुक्रवारी (ता.6) उत्साहात साजरे झाले. दरवर्षी जानेवारीच्या 6 तारखेला हे फेस्त साजरे होते. केवळ अर्ध्या दिवसाच्या या फेस्ताला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

ख्रिश्‍चन बांधवांप्रमाणे येथील हिंदूंची रेमेद सायबिणीवर श्रद्धा आहे. त्यामुळे मुर्डी व आसपासच्या गावातील हिंदू भाविकही या फेस्ताला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पहाटे पाच ते दुपारपर्यंत विशिष्ट वेळेतच हे फेस्त साजरे केलेजाते.

दरम्यान, पहाटे 4 वा. पहिली प्रार्थना सभा झाल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत ती चालूच होती. संध्याकाळच्या सत्रात चार वाजता सुरू झालेली प्रार्थना सभा 5वा. संपेली. या फेस्तासाठी मुरगाव तालुका व्यतिरिक्त गोव्यातील इतर भागातूनमोठ्या संख्येने ख्रिस्ती तसेच हिंदू भाविक तसेच विदेशी नागरिकही या फेस्ताला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कपेलकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे; परंतु थ्री किंग्स डोंगराच्या पारंपरिक वाटेतूनच कपेलकडे येतात. नाथानियल ग्रेसियस, गिब्सन गोम्स, नाशोन जॅक्स या तिघांना आजच्या फेस्तात किंग्स बनण्याचा मान मिळाला.

कासावलीच्या मुर्डी गावातील डोंगरमाथ्यावर निर्जनस्थळी अवर लेडी ऑफ रेमेडियोसचे सुंदर कपेल आहे. हे कपेल रेमेद सायबिणीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या फेस्ताचे मुख्य आकर्षण म्हणजे थ्री किंग्स मास्टर्स.

हे मास्टर्स म्हणजे तीन किशोरवयीन मुले राजकुमारांच्या वेषात घोड्यावर स्वार होऊन प्रार्थनेला उपस्थित राहिली. हा मान फक्त कासावली, कुएली तसेच आरोसी गावातील मूळ गावकार कुळातील मुलांनाच मिळतो. यामुळे या फेस्ताला थ्री किंग्सचे फेस्त म्हणून संबोधले जाते.

फेस्ताविषयी अनेक आख्यायिका

या फेस्ताविषयी अनेक आख्यायिका गावातील जाणकारांकडून ऐकायला मिळतात. काहींच्या मते हे राजकुमार देवाचे दूत असून सुख व शांतीचे प्रतीक आहेत. फेस्ताच्या या वेगळ्या परंपरेमुळे ख्रिस्ती बांधवांपर्यंत या फेस्ताची कीर्ती पोहचलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

AI Based Exam Reforms: पेपरफुटीला कायमचा आळा बसणार? परीक्षेच्या दिवशी AI तयार करणार प्रश्नपत्रिका!

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT