Goa Road Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: गोव्यात 3 अपघातांत 3 ठार; संतप्‍त लोकांनी रोखला महामार्ग

Goa Accident Case: सुकतळी-मोले, बोलशे-फातोर्डा, लोटलीतील घटना

गोमन्तक डिजिटल टीम

सुकतळी-मोले येथील राष्ट्रीय महामार्गावर गेल्‍या दोन दिवसांपासून नादुरुस्‍त अवस्‍थेत उभा असलेल्‍या ट्र्कला पाठीमागून जोरदार धडक दिल्‍याने दुचाकीस्‍वार तन्‍वेष रिवणकर (२५, रा. कुळे) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. काल सोमवारी मध्‍यरात्री बाराच्‍या सुमारास हा अपघात घडला. ट्र्कचालक मंजुनाथ शिवा बसनावर याला कुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्‍यान, बोलशे-फातोर्डा सर्कलकडून रावणफोंडच्या दिशेने जाताना मॅक्स शो रुमजवळ रस्त्यावर घसरुन पडल्याने दुचाकीचालक ऑलविन फर्नांडिस (फातोर्डा) याचा तर लोटली येथे मध्यरात्रीनंतर एका अवजड वाहनाने पादचाऱ्याला ठोकरल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला. मृताची ओळख पटलेली नाही. पोलिस (Police) त्‍या वाहनाचा शोध घेत आहेत.

दरम्‍यान, तन्‍वेष याची आई मुख्याध्यापिका तर वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्‍यांचा तन्‍वेष हा एकुलता एक मुलगा. तोच अपघातात मरण पावल्‍यामुळे त्‍याच्‍या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न

तन्‍वेषच्‍या मृत्‍यूची बातमी वाऱ्यासारखी कुळे व आजूबाजूच्या गावांत पसरली तेव्हा लोकांनी ताबडतोब घटनास्‍थळी धाव घेतली. अपघातात कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकावर गुन्‍हा नोंद करावा अशी मागणी करत त्‍यांनी राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला.

त्‍यामुळे कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतप्‍त लोकांची समजूत काढली व राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. तसेच मंजुनाथ बसनावर याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल केला.

रस्‍त्‍यावर बंद पडलेला ट्रक ठरला ‘यमदूत’

दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातून गोव्यात आलेला ट्र्क सुकतळी येथे चढणीवर बंद पडला. तेव्‍हापासून तो तेथेच उभा आहे. काल सोमवारी रात्री तन्‍वेष हा ओला दुचाकीने उसगावमार्गे कामावर जात होता. सदर चढणीवर पोहोचला असता दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीच्या प्रकाशामुळे त्‍याला समोर पार्क केलेला ट्रक स्‍पष्‍ट दिसला नाही आणि हा अपघात घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT