Virnoda Pernem Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accidents: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच! आणखी तीन बळी; मांद्रेतील तिसऱ्या तरुणीचाही मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident News

पेडणे / मडगाव : विर्नोडा-पेडणे येथे आज पहाटेच्‍या सुमारास बॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअपला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्‍याने पिकअपचालक नियाझ झारी (३८) हा जागीच ठार झाला. तर मांद्रे अपघातात जखमी झालेल्‍या सिद्धी शेटकर हिचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सांकवाळ अपघातात महिला गतप्राण झाली.

गेल्‍या तीन दिवसांत राज्‍यात विविध ठिकाणी झालेल्‍या तीन अपघातांत एकूण सातजणांना मृत्‍यू आला. त्‍यामुळे गेल्‍या साडेआठ महिन्‍यांत म्‍हणजेच जानेवारीपासून आतापर्यंत रस्‍तेअपघातांतील बळींची संख्‍या २०० वर पोहोचली आहे. त्‍यात दुचाकीस्‍वारांचे प्रमाण हे ६० टक्‍के आहे.

विर्नोडा-पेडणे अपघातात अन्‍य दोघेजण किरकोळ जखमी झाले. या अपघातात पिकअपमधील शेकडो कोंबड्यांचाही मृत्‍यू झाला. सरकारी महाविद्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील उड्डाणपुलावर पहाटे चारच्‍या सुमारास हा अपघात घडला. त्‍यात मृत्‍यू पावलेला नियाझ झारी हा मूळ निपाणी येथील असून, सध्‍या तो दाबोळी-वास्को येथे राहत होता.

अपघातात पिकअपचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर मागून धडक दिलेला ट्रक पळून गेला. पेडणे पोलिसांनी शोध घेऊन धारगळ येथे हा ट्रक ताब्‍यात घेतला. तसेच चालक मुत्ताप्पा कोलकर (३७) याला अटक केली. साहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत पार्सेकर यांनी अपघाताचा पंचनामा करून नियाझ झारी याचा मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला. उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर पुढील तपास करत आहेत.

विंड स्‍क्रीनमधून बाहेर उसळून रस्‍त्‍यावर आदळला

नियाझ झारी हा आजरा-कोल्हापूर येथून पिकअपमधून (जीए ०६ टी ९२८६) गोव्यात रॉयल फूडसाठी बॉयरल कोंबड्या घेऊन येत होता. वळपे-विर्नोडा येथे पोहोचल्यावर पिकअपच्या मागे असलेल्या ट्रकने (एमएच ०८ एपी ६५४३) जोरदार धडक दिल्याने पिकअपचालक विंड स्क्रीनमधून बाहेर पडून रस्त्यावर आदळला. गंभीर दुखापत झाल्‍याने तो जागीच ठार झाला. सोबत असलेले दोघेजण किरकोळ जखमी होऊन बचावले.

बसची स्‍कूटरला धडक,जखमी महिलेचा मृत्‍यू

उपासनगर-सांकवाळ येथे एका खासगी बसने ॲक्टिव्हा स्कूटरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४५ वर्षीय पिएदाद आंद्रादे या महिलेचा मृत्यू झाला. पती स्‍कूटर चालवत होता. मधे १२ वर्षाचा मुलगा व मागील सीटवर महिला बसल होती. अपघातानंतर जखमी महिलेला इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले. परंतु, तिची प्राणज्‍योत मालवली होती. आज सोमवार, (दि. १६) रोजी दुपारी १३.५५ वाजता कला भवन जवळील उपासनगर येथे हा अपघात घडला. या प्रकरणी बसचालक रामचंद्र नागराज शिंदे याला अटक करण्‍यात आली. त्‍याची रात्री जामिनावर सुटका झाली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक करीत आहेत.

मांद्रे येथे १४ रोजी भीषण अपघात होऊन सानिका खर्बे व प्रियांका खर्बे या नणंद - भावजयीचा मृत्‍यू झाला होता. मृत प्रियांका यांची बहीण सिद्धी शेटकर ही गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्यावर बांबोळी इस्‍पितळात उपचार सुरू असताना सोमवार, १६ रोजी तिचीही प्राणज्‍योत मालवली. एकाच घरातील तिघा जणांचा मृत्‍यू झाल्‍याने मांद्रे परिसर दु:ख सागरात बुडाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT