Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी
Mumbai Goa Highway AccidentDainik Gomantak

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Malvan Kolhapur Tuljapur Bus Accident: सर्व्हिस रोडवर उभ्या असणाऱ्या कंटेनरला बसने धडक दिल्याने अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
Published on

Mumbai Goa Highway Accident

सिंधुदुर्ग: मुंबई - गोवा महामार्गावरुन कोल्हापूर-तुळजापूरला जाणाऱ्या महामंडळाच्या बसचा कंटेनरला धडकून भीषण अपघात झाला आहे. यात २६ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.

रविवारी (दि.१५ सप्टेंबर) रोजी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. सिंधुदुर्गातील कसाल डेपोमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण आगाराची एसटी बस रविवारी सकाळी कसाल येथून कोल्हापूर-तुळजापूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. यात सुमारे ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. बस सर्व्हिस रोडवर येत असताना रस्त्यावर उभ्या असणाऱ्या कंटेनरला बसने जोराची धडक दिली.

यात सुमारे २६ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी ओरोस येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार जखमी प्रवशांमध्ये कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी
Maharashtra Development: तरुणांच्या हाताला काम, गुंतवणूक अन् विकासाला चालना देतयं महायुती सरकार! जाणून घ्या

अपघाताचे कारण अद्याप समोर आले नसून, पोलिसांकडून याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बसचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यात अपघातावेळी उपस्थित असणाऱ्या स्थानिकांनी केला आहे. अपघाताचा अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com