Bangladeshi detainees Dainik Gomantak
गोवा

डिटेन्शन सेंटरचे पत्रे उचकटून गोव्यातून बांगलादेशी नागरिकांचे पलायन! पोलिसांची निष्क्रियता उघड

Mapusa Detention Center: या बांगलादेशी नागरिकांना पेडणे पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: तिघा बांगलादेशी नागरिकांनी समाज कल्याण संचालनालयाच्या स्थानबद्धता केंद्राच्या (डिटेन्शन सेंटर) छताचे पत्रे उचकटून संरक्षक भिंतीवरून उडी मारून पलायन केले. विशेष म्हणजे, या केंद्रावर चार पोलिसांचा पहारा असतो. या चारही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी पोबारा केल्यामुळे पोलिसांची निष्क्रियता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

याप्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांकडून सध्या शोधमोहीम सुरू आहे.मोहम्मद हावलेदर (१९), मोहम्मद हिलाल (३५), मोहम्मद मरिदा (२५) अशी त्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी रविवारी पहाटे ३ ते ४ या कालावधीत पलायनाची योजना अंमलात आणली.

या बांगलादेशी नागरिकांना पेडणे पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने तिघांना दोषी ठरविले होते. कोलवाळ कारागृहात सहा महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर या तिघांना डिसेंबर २०२३ मध्ये म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवले होते.

या तिघांकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याने त्यांना मुक्त केले नव्हते. याविषयी गृह खात्याने बांगलादेश प्रशासनाशी संपर्क साधला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे तिघांनाही म्हापसा स्थानबद्धता केंद्रात ठेवले होते.

ठाण्याजवळच केंद्र, तरी पोलिस अनभिज्ञ

म्हापसा पोलिस स्थानकाच्या शेजारीच असलेल्या या स्थानबद्धता केंद्रात २४ डिसेंबर २०२३ रोजी या तीन बांगलादेशी नागरिकांना ठेवले होते. आता ते पळून जाण्यात यशस्वी ठरल्याने या केंद्राच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT