गुजरातमध्ये व्यापाऱ्यावर गोळी मारून 40 लाख रूपयांना लुटल्याची घटना घडली. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी गुजरातमधून गोव्याला पळ काढला. दरम्यान, गोवा पोलिसांना याबाबत मिळालेल्या माहितीनंतर कळंगुट परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुजरातच्या गांधीधाममधील अपना नगर भागात 29 जानेवारी रोजी ही घटना घडली. रविवारी गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
(Three arrested for robbing Gujarat businessman of Rs 40 lakhs from Goa’s Calangute)
मनुसिंग ठाकोर, छत्रपाल सिंग आणि सुरत सिंग अशी तीन आरोपींची नावे आहेत. गुजरात आणि गोवा पोलिसांनी (Gujrat And Goa Police) संयुक्तपणे ही कारवाई केली.
गांधीधाम पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड विधान कलम (IPC) 120-बी, 394, 397, 447 आणि 307 आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गोव्यातील कळंगुट पोलिसांना (Calangute) तिन्ही आरोपी गोव्यात असल्याची माहिती मिळाली. मनुसिंग ठाकोर, छत्रपाल सिंग आणि सुरत सिंग हे गोव्यातील वेगवेगळ्या भागातील होते. पोलिसांनी शनिवारी मनुसिंग ठाकोरला कांदोळी फुटबॉल मैदानाजवळून अटक केले.
मनुसिंग ठाकोरची चौकशी केली असता त्याच्याकडून इतर दोघांची माहिती मिळाली. पोलिसांनी छत्रपाल सिंग आणि सुरत सिंग यांना कॅसिनो बोटींवरून अटक केली. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी साताऱ्यात गुन्हा करून गोव्यात लपलेल्या गुन्हेगारांना अशाच पद्धतीने गोवा पोलिसांनी अटक केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.