Railway Station In Goa
Railway Station In GoaDainik Gomantak

Railway Station In Goa: वास्को- सावर्डे रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलणार

अमृत भारत योजने अंतर्गत ही रेल्वे स्थानके होणार विकसित
Published on

अमृत ​​भारत योजनेंतर्गत वास्को आणि सावर्डे ही रेल्वे स्थानके विकसित करण्यात येणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी “अमृत भारत स्थानक” योजना या शीर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. अमृत भारत स्थानक योजनेमार्फत रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. या धोरणाअंतर्गत वास्को आणि सावर्डे ही रेल्वे स्थानके विकसित होणार आहेत.

अमृत भारत स्थानक योजनेची उद्दिष्टे :-

  • रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करणे आणि त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे. स्थानकावर रूफ प्लाझा आणि सीटी सेंटर निर्माण करणे.

  • रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी जागा सोडण्यात येईल आणि रेल्वे कार्यालये योग्य ठिकाणी स्थलांतरित केली जातील.

  • एक स्थानक एक उत्पादनासाठी किमान दोन स्टॉल्सची तरतूद केली जाईल.

  • एक्झिक्युटिव्ह लाउंज आणि छोट्या व्यावसायिक बैठकांसाठी देखील जागा उपलब्ध केली जाईल.

  • सर्व श्रेणीच्या स्थानकांवर उच्च स्तरीय प्लॅटफॉर्म (760-840 मिमी) तयार केले जातील. प्लॅटफॉर्मची लांबी साधारणपणे 600 मीटर असावी.

  • प्लॅटफॉर्म छताची लांबी, स्थान आणि टप्पा स्थानकाच्या वापराच्या आधारे ठरवले जातील.

  • स्थानकांवरील दिव्यांगजनांसाठीच्या सुविधा रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील.

Railway Station In Goa
Water Shortage: ...यामुळे म्हापशाच्या तीन प्रभागात पाणीटंचाई

गोवा हे पर्यटनाच्या दृष्टीने अग्रगण्य राज्य ओळखलं जातं. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेटी देत असतात. त्यामुळेच गोवा सरकारने प्रवासाच्या दृष्टीने विमानसेवा, रेल्वेसेवा, रस्ते वाहतूक या सोयीसुविधांचा विस्तार केला आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत वास्को आणि सावर्डे रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com