Goa Political show Dainik Gomantak
गोवा

Goa Political show: काँग्रेसला सद्‍बुध्दी लाभो; मुख्यमंत्र्यांच्या गावात नियम 12 च्या भावात

कॉग्रेस ने काल साखळीत "सदबुध्दी यात्रेचे" आयोजन कले होते. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन मेणबत्ती पेटवून त्यांना फुले द्यावी अशा कार्यक्रमाचे आयोजन होते.

दैनिक गोमन्तक

साखळी: मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी विधानसभेत (Goa Assembly) केलेल्या वक्तव्याविरोधात कॉग्रेसने (Congress) काल साखळीत आयोजित केलेल्या "सद्भुध्दी यात्रेला" विरोध करण्यासाठी साखळी मतदार संघातील भाजपचे (BJP) हजारो कार्यकर्ते साखळीत जमले त्यामुळे दोन्हीही बाजूंनी समोरासमोर कॉग्रेस व भाजप कार्यकर्ते भिडल्यास तणाव निर्माण होईल या भितीने खबरदारी म्हणून पोलिसांनी कायदा सुरक्षेसाठी दोन्हीही बाजूंनी कॉग्रेस व भाजप कार्यकर्त्यांना अडवले. कॉग्रेस कार्यकर्ते बळजबरीने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून पोलिसांनी बळजबरीने काही कार्यकर्त्यांना पकडून पोलिस वाहनात नेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ वातावरण तंग झाले. साखळी परिसरात कडक सुरक्षा म्हणून पोलिस फौज तैनात करण्यात आली होती. (Thousands of BJP workers had gathered to challenge Congress in goa)

बाणावलीत झालेल्या एका मुलीवरील बलात्कार संदर्भात विधानसभेत डॉ.प्रमोद सावंत यांनी विधान केले होते की सरकार बरोबर पालकांनीही आपल्या मुलींची जबाबदारी घ्यावी. या वक्तव्यावर कॉग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला होता.या वक्तव्याला विरोध म्हणून कॉग्रेस ने काल साखळीत "सदबुध्दी यात्रेचे" आयोजन कले होते. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन मेणबत्ती पेटवून त्यांना फुले द्यावी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Goa Political show

भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांचा कॉग्रेस विरोधात जमाव

कॉग्रेसचा असा कार्यक्रम साखळीत आज संध्याकाळी होणार याचा सुगावा भाजपच्या कार्यकर्त्यांना लागताच संपुर्ण साखळी मतदार संघातील कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे समर्थन करुन कॉग्रेसच्या यात्रेला विरोध करण्यासाठी साखळीत जमु लागले.प्रथम सर्व कार्यकर्ते साखळी येथील रवींद्र भवनाकडे जमले.नंतर सर्व भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्री डॉ.सावंत यांच्या साखळी गृहनिर्माण वसाहतीमधील निवासस्थानी जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना गृहनिर्माण वसाहत जंक्शनवर अडवले. या जंक्शनवर हजारो कार्यकर्त्यांचा जमाव जमला. कार्यकर्त्यांनी कॉग्रेसविरोधात घोषणा देण्यास तसेच भाजप व मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास प्रारंभ केला. मुख्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यकर्त्यांची भेट घेतली.

Goa Political show

कॉग्रेस कार्यकर्ते हॉस्पिटल जंक्शनवरच जमले

कॉग्रेस पक्षाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवा कॉग्रेसचे वरद म्हार्दोळकर व इतर नेते साखळी हॉस्पिटल जंक्शनजवळ पोहचल्यानंतर साखळी मतदार संघातील काही प्रमुख कार्यकर्त्यांसह सभा घेण्यात आली. साखळी चे माजी आमदार प्रताप गावस, साखळीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी, साखळीचे नगरसेवक राजेश सावळ, साखळीचे माजी सरपंच प्रविण ब्लेगन, प्रदेश सरचिटणीस खेमलो सावंत,साखळी गट कॉग्रेसचे अध्यक्ष मंगलदास नाईक, अनंत पिसुर्लेकर, साखळीच्या माजी नगराध्यक्षा सुनीता वेरेकर, रेणूका देसाई, महादेव खांडेकर, कॉग्रेस सेवा दलाचे रमेश सिनारी, दशरथ मांद्रेकर आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी सभेला मार्गदर्शन करताना प्रविण ब्लेगन म्हणाले मुख्यमंत्री डॉ.सावंत यांचे ते विधान म्हणजे सरकारची जबाबदारी झटकण्याचाच प्रकार आहे.आज साखळी पोलिस फौज जी आणली आहे तशी फौज बाणावली बिच परिसरात असती तर बलात्कारासारखी घटना घडलीच नसती.धर्मेश सगलानी यावेळी बोलताना म्हणाले गोवा पर्यटनासाठी प्रसिध्द आहे.

बलात्कारासारख्या घटना घडल्या तर गोव्याची सुरक्षा धोक्यात येईल व खाण व्यवसाया पाठोपाठ पर्यटन व्यवसायही बंद पडेल.मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदार विधान न करता गोव्याच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवावे.सुनिता वेरेकर म्हणाल्या सरकार पोलिस खात्याचा वापर गोव्याच्या जनतेसाठी न करता स्वताच्या मंत्र्यांसाठीच करीत आहे म्हणून गुन्हे वाढत चालले आहे. गुन्हेगारांना शासन होत नाही.जनता भयभीत झाली आहे व मुख्यमंत्री बेजबाबदार विधाने करीत आहेत. खेमलो सावंत यांनी प्रास्ताविक केले.

Goa Political show

कॉग्रेस कार्यकर्त्यांना पकडून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न

हॉस्पिटल जंक्शन जवळून मुख्यमंत्री निवास अशी "सद्बुध्दी यात्रे" ला कॉग्रेसतर्फे प्रारंभ करण्यात आला असता पोलिसांनी या यात्रेला पुढे जाण्यास मज्जाव केला व कॉग्रेस नेत्यांना सांगितले की भाजप कार्यकर्त्यांच्या जमावालाही दुसऱ्या बाजूने अडवून ठेवले आहे.दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास अनुचित प्रकार घडू नये.या वेळी कॉग्रेस नेत्यांनी पोलिसांना सांगितले की आम्ही गांधीगीरीने शांततेने मुख्यमंत्र्यांना भेटून सद्बुध्दीसाठी फुले देणार आहोत जबाबदारीने वागण्यास सांगणार आहोत आम्हाला जाऊ द्या.परंतु पोलिसांनी ऐकले नाही व यात्रा अडवून धरली कॉग्रेस कार्यकर्त्यांनी या कृतीचा निषेध करुन बळजबरीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही कॉग्रेस कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी पोलिस वाहनात नेण्याचा प्रयत्न करु लागले आणि साखळीत एकच गदारोळ माजला काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तिथे उपस्थित असलेल्या डिचोली तालुका उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांनी पोलिसांना आवाहन केल्यानंतर पकडलेल्या सर्व कॉग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडले. कॉग्रेस कार्यकर्त्यांना पुढे जाऊ देत नसल्याने कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून "रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम.. प्रमोदाक सदबुध्दी दे भगवान.. चलयांक संरक्षण दे भगवान" असे रचलेले भजन गाण्यास सुरुवात केली."इन्क्लाब जिंदाबाद" ," वंदे मातरम" अशा घोषणा दिल्या.

Goa Political show

भाजप कार्यकर्त्यांना भेटल्या सुलक्षणा सावंत

दुसऱ्या बाजुने भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांना एका बाजुला पोलिसांनी अडवले होते व हे कार्यकर्ते कॉग्रेस च्या विरोधात नारा देत होते व भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांचे समर्थन करीत होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी भाजप कार्यकर्त्यांना भेटून मार्गदर्शन केले.

सद्बुध्दी कॉग्रेसलाच लाभो, सुलक्षणा प्रमोद सावंत

राजकारणासाठी राजकारण करणाऱ्या कॉग्रेसवाल्यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता जनतेवर आली आहे.त्यामुळे कॉग्रेसलाच "सदबुध्दी" लाभण्याची खरी गरज आहे अशी प्रतिक्रिया यावेळी भाजप महिला नेत्या सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.सरकार जनतेचे रक्षण करण्यास सक्षम आहेच पण त्याचबरोबर आपल्या मुलांची जबाबदारी पालकांचीही असते. यामध्ये मुख्यमंत्री काय वावगे बोलले ? याचा एवढा बाऊ करुन कॉग्रेस स्वताचेच हसे करुन घेत आहे. कॉग्रेस च्या कृतीला विरोध करण्यासाठी आज हजारो भाजप कार्यकर्त्यांचा जमलेला जमाव ही कॉग्रेस ला बसलेली एक चपराकच आहे.असे मत सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट घेऊन प्रतिक्रिया विचारली असता आपले आज जमलेले हजारो कार्यकर्ते हीच आपली खरी प्रतिक्रिया असून आपण अधिक काहीही बोलू इच्छीत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT