Goa Police Crime News: Daiinik Gomantak
गोवा

Goa Crime News: कुंकळ्ळीतून बेपत्ता झालेली ‘ती’ भावंडे अखेर सापडली!

Goa Crime News: मामाच्या घरी निघाली, पत्ता चुकल्याने कळंगुटला पोहोचली

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: कुंकळ्ळी येथून तीन सख्खी अल्पवयीन भावंडे काल अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ माजली होती. मात्र काल रात्रीच ती कळंगुटमध्ये सापडली. या तिन्ही मुलांचा मामा साखळी येथे राहतो. ती आपल्या मामाकडे निघाली होती.

पण मामाच्या घरचा पत्ता बरोबर माहीत नसल्याने ती वाट चुकून कळंगुटमध्ये पोहोचली. सदर घटना काल शनिवारी घडली होती. कुंकळ्ळी पोलिस हरवलेल्या भावंडांचा शोध घेत होते. मात्र पूर्ण दिवस गेला तरी मुलांचा पत्ता लागला नाही. शेवटी रात्री ती सापडल्यावर त्यांना मामाच्या स्वाधीन करण्यात आले.

या मुलांचे वडील मूळ पश्चिम बंगालमधील असून ते कामगार म्हणून काम करतात. पांझरखणी येथे हे कुटुंव वास्तव्यास आहे.

या मुलांच्या वडिलांनी आपली पत्नी मरण पावल्यानंतर दुसरे लग्न केले आहे. ही मुले पहिल्या पत्नीपासूनची आहेत.

सावत्र आईच्‍या जाचाला कंटाळली

सावत्र आईच्या वागण्याला कंटाळून या तीन अल्‍पवयीन मुलांनी घर सोडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या तिन्ही भावंडांत १६ वर्षांची एक मोठी मुलगी असून तिच्याकडे असलेल्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्‍यांचा ठावठिकाणा पोलिसांना मिळाला. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT