Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Thivim Theft: 2 दुकाने फोडली, पोस्ट ऑफिसमधली तिजोरी पळवण्याचा प्रयत्न; थिवी परिसरात चोरट्यांची दहशत

Thivim Crime: पोस्ट कार्यालयाच्‍या दरवाजाची कडी तोडून संशयित आत शिरले. तेथील सर्व कपाटे त्यांनी फोडली. तसेच तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती फुटत नसल्याचे पाहून ती उचलून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

Sameer Panditrao

म्हापसा : थिवी येथे दोन दुकाने फोडून ७५ हजारांची रोख पळविण्‍यात आली. मात्र तेथील पोस्ट कार्यालयातील तिजोरी उचलून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्‍न फसला. ही घटना आज पहाटे २ ते ५ यादरम्यान घडली. सकाळी साडेसहाच्‍या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. कोलवाळ पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मिळालेल्‍या माहितीनुसार, होळावणे-थिवी येथील ‘बोस्‍टियन रेसिडन्सी’ इमारतीच्या तळमजल्यावरील फिर्यादी मिथिला च्यारी यांचे विश्‍‍वकर्मा जनरल स्टोअर आणि शेजारील नीलेश बदाचे यांच्‍या मालकीच्‍या वाईन स्टोअर दुकानाची कुलुपे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. च्यारी यांच्या दुकानातील १० ते १२ हजार रुपये तर बदाचे यांच्या दुकानातील ६३ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

नंतर पोस्ट कार्यालयाच्‍या दरवाजाची कडी तोडून संशयित आत शिरले. तेथील सर्व कपाटे त्यांनी फोडली. तसेच तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती फुटत नसल्याचे पाहून ती उचलून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र ते त्यांना शक्य झाले नाही.

चाकू घेऊन खुलेआम फिरत होते चोरटे

तत्पूर्वी, बुधवारी रात्री चोरटे बोस्‍टियन रेसिडेन्सी इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या बेकरीस्थळी गेले होते. बेकरीच्या मालकाने त्यांना हाकलून लावले होते. त्यावेळी त्यांच्या हातात गोणी होती. यात चोरीसाठी वापरणारी हत्यारे होती. शिवाय संशयितांनी चोरीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवला होता. त्‍यामुळे तो माणूस पळून गेला होता.

दुचाकी वाहनांचीही केली नासधूस

चोरट्यांनी आपला मोर्चा जवळच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीकडे वळविला व तळमजल्यावरील तीन दुचाकींच्या वायर तोडून नासधूस केली. तसेच रस्त्याच्या शेजारी पार्क केलेली एक मोटारसायकल चोरून ती काही अंतरावर नेऊन टाकली. एका घराच्या आवारात पार्क केलेल्या कारगाडीची देखील नासधूस केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT