Thivim football ground Dainik Gomantak
गोवा

Thivim: काम पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदाराला दिले 53 लाख, फुटबॉल मैदानावरून थिवीच्या सरपंचांना घेरले; संयुक्त बैठकीचा ठराव

Thivim football ground: लवकरात लवकर मैदान देखरेख समिती, कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक बोलवावी असा ठराव घेण्यात आला.

Sameer Panditrao

थिवी: येथील ग्रामसभा मैदानाच्या कामावरून बरीच वादळी ठरली. मैदानाचे काम पूर्ण न होताच कंत्राटदाराला कामाचे पैसे फेडल्याने ग्रामस्थ रॉबर्ट कुलासो यांनी सरपंचांना घेरण्याचा प्रयत्न केला. ५३ लाख देण्यापूर्वी मैदान देखभाल समितीला विश्वासात का घेतले नाही असाही प्रश्न त्यांनी केला. दरम्यान, लवकरात लवकर मैदान देखरेख समिती, कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक बोलवावी असा ठराव घेण्यात आला.

या सभेला सरपंच व्यंकटेश शिरोडकर, उपसरपंच हर्षता कळंगुटकार, पंच शिवदास कांबळी, मायकल फर्नांडिस, गीता शेळके, तुळशीदास शिंदे, प्रीती आरोलकर, सुनीता साळगावकर, समीक्षा मयेकर, सचिव गोविंद खलप व निरीक्षक विद्याधर साळगावकर उपस्थित होते.

माडेल थिवी येथील बस थांब्यावर सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत परप्रांतीय कामगारांचे जत्थे उभे असतात. त्यामुळे गावातील महिलांना बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबणे असुरक्षित वाटते. गेल्या ग्रामसभेत हा विषय मांडला होता, त्याचे पुढे काय झाले असा प्रश्न नीलेश साळगावकर यांनी केला. यावर पंचायतीने पोलिसांना पत्र लिहून कळविल्याचे सरपंचानी सांगितले. परंतु अजून त्या ठिकाणी कोणतीच कारवाई झाल्याचे येत नाही.

त्यामुळे पोलिस निरीक्षकांना भेटून हा प्रश्‍न सोडवावा अशी मागणी यावेळी केली. पंचायत क्षेत्रात यापुढे मोठ्या बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्यापूर्वी त्यांनी दाखविलेल्या रस्त्याची रुंदी तपासून पाहावी व त्यानंतरच मंजुरी द्यावी, अशी सूचना करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT