Shri Kamakshi Devi Temple in Shiroda village of Goa Twitter
गोवा

Plan Goa trip: निसर्गसौंदर्याने समृद्ध आहे गोव्यातील एक सुंदर गाव

गोव्यातील (Goa) अंत्रूज महाल फोंडा (Ponda) तालुक्यात शिरोडा (Shiroda) हा गाव क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने खूपच मोठा

Ramesh Vaskar

गोव्यातील (Goa) अंत्रूज महाल फोंडा (Ponda) तालुक्यात शिरोडा (Shiroda) हा गाव क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने खूपच मोठा. एका बाजूला उंचच उंच डोंगर टेकड्या आणि दुसऱ्या बाजूला जुवारी नदीचा नागमोडी वळसा. मध्यभागी शेती, बागायती आणि डोंगर टेकड्यांवर काजूची बनेच बने. आंबा, फणस, कोकम यांसारख्या झाडांबरोबरच माड, पोफळ, फळांनी आणि फुलझाडांनी भरलेला समृद्ध असा गाव. (This is one of the most beautiful villages in Goa)

शिरोडा गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व बागायती. जुवारी नदीच्या काठी प्रचंड मोठी खाजनशेती आहे. या शेतीत तसेच इतर भागातील शेतीत ‘भौस’ शेतकरी भाताची दोन पिके घेतात. शिवाय बागायती पिकेही मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. पूर्वीच्या काळी काही शेतीभाती पिकावरच गावातील लोकांचे पोट चालायचे. शिरोडा गावात ठिकठिकाणी बारमाही वाहणारे झरे, तलाव आहेत. त्यात श्री माधव गणपती मंदिराशेजारील तलाव, शिवनाथी, पाज, पकरतळे. तारीवाड्याजवळील विस्तीर्ण तलावाच्या पाण्यावर येथील शेती, बागायती पोसली जाते. शिवाय हा भाग पाण्यामुळे हरित झालेला आहे.

गावात वाड्यावाड्यांवरील धालोमांड, शिमगोमांड तसेच लहानमोठ्या मंदिरांतील कार्यक्रमांमुळे येथील लोककला जिवंत राहिली आहे. शिरोडा हा गाव सर्वच दृष्टीने समृद्ध बनलेला आहे.

गावाने दिली अनमोल रत्‍ने

शिरोडा गावाला समाजसेवेची मोठी परंपरा आहे. जागतिक कीर्तीचे स्त्रीरोगतज्ञ डॉ. विठ्ठलराव शिरोडकर याच गावचे सुपुत्र. गोमंतभूषण डॉ. सखाराम गुडे, डॉ. अनंत बखले हेही शिरोड्याचे. त्याचबरोबर श्रेष्ठ कलाकार मेनकाबाई शिरोडकर, शोभा गुर्टू, काशिनाथ शिरोडकर, सुदेश भोसले, नरेंद्र भोसले, व्हायोलिनवादक नारायण देसाई, कलाकार पिसोमाम शिरोडकर यांसारख्या अनेक कलाकारांनी आपल्या कलेद्वारे शिरोडा गावचे नाव देशभर पोचवले आहे.

शैक्षणिकदृष्ट्या गाव खूपच पुढे आहे. के. जी. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक ते महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा गावातच उपलब्ध आहेत. शिवाय आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथिक महाविद्यालय, अभियांत्रिकी इऩ्फोटेक्नोलॉजी संस्था शिरोडा गावात आहेत. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला केजीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची सोय ही गावातच उपलब्‍ध होते.

देवदिकांचा गाव

शिरोडा गावचे आद्यग्राम दैवत शिवनाथीचा श्री शिवनाथ शिवाय थळ येथील श्री कामाक्षी देवी, श्री रायेश्वर, श्री शांतादुर्गा, श्री लक्ष्मीनारायण, श्री महामाया, श्री रवळनाथ, श्री ब्रह्मदुर्गा, श्री मंडलेश्वर, श्री खुटादेवी, श्री जल्मी, श्री भूमिपुरुष, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, माधवगणपती, श्री सत्यनारायण देवस्थान, श्री आपैकार, श्री वाळपेकार, श्री हनुमान मंदिर आदी लहान-मोठ्या मंदिरानी हा गाव भरून गेलेला आहे. श्री शिवनाथ मंदिरासमोर प्रशस्त व नयनरम्‍य तलाव आहे. तेथे जत्रोत्सवाला श्री शिवनाथाचा नौकाविहार होतो. जत्रोत्सव, नवरात्रोत्सव, दसरोत्सव, शिमगोत्सव आदी उत्सव या मंदिरात होतात. नित्यपूजेबरोबरच भजन, आरती, कीर्तन, पालखी, लालखी उत्सव हे चालूच असतात. ग्रामदैवत श्री शिवनाथाची ख्याती दूरवर पसरलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT