Amit Patkar dainik gomantak
गोवा

हा निर्णय म्हणजे गोमंतकीय जनतेचा विजय: अमित पाटकर

काँग्रेसकडून स्‍वागत: लोकांना न्‍यायासाठी लागतेय झगडावे

दैनि्क गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: राज्‍यात रेल्‍वे दुपदरीकरणासाठी राष्ट्रीय वन्‍यजीव मंडळाने दिलेली मान्यता सर्वोच्च न्‍यायालयाने आज रद्द केली. या निर्णयाचे गोवा प्रदेश काँग्रेसने स्‍वागत केले आहे. हा जनआंदोलनाचा विजय आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते कॅप्‍टन विरिएतो फर्नांडिस आणि पदाधिकाऱ्यांची उपस्‍थिती होती.

राज्‍यातील थ्री लिनियर प्रकल्प रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष जोरदार लढा देत आहे. हा निकाल म्हणजे जनआंदोलनाचा विजय असल्याचे पाटकर म्‍हणाले. रेल्वे दुहेरी मार्गासाठी राष्ट्रीय वन्‍यजीव मंडळाने मान्यता दिली होती.

ती रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पक्ष स्वागत करत आहे. समस्‍त गोमंतकीयांचा हा विजय आहे. केवळ भांडवलदारांच्या बाजूने आणि त्यांच्या बाजूने काम करणाऱ्या असंवेदनशील भाजप सरकारमुळे लोकांना न्यायासाठी झगडावे लागत आहे. केंद्र सरकारच्‍या दबावामुळे राज्‍य सरकार लोकांना नको असलेले प्रकल्प जबरदस्‍तीने लादत आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

कॅप्टन फर्नांडिस म्‍हणाले की, राज्‍यातील पर्यावरण सांभाळण्‍यासाठी हा लढा होता. कोरोना काळातील थ्री लिनियर प्रकल्प शंकास्पद पद्धतीने सुरू होते. गोव्याला कोळसा केंद्र बनविणे आणि शेजारच्या राज्यांमध्ये कोळशाची वाहतूक सुलभ करणे हे भाजपचे उद्दिष्ट अाहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

SCROLL FOR NEXT