Building  Dainik Gomantak
गोवा

डिचोली मधील 'ती' इमारत कोसळण्याची शक्यता; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

डिचोली पालिका मारतीची भक्‍कमपणे डागडुजी करावी किंवा या इमारतीच्या जागी नव्याने प्रकल्प उभारणे आवश्‍यक असल्याचे मत काही दुकानदार व्यक्‍त करीत आहेत.

दैनिक गोमन्तक

Building: डिचोली पालिकेची जुनी बाजार इमारत दिवसेंदिवस कमकुवत बनत असून या इमारतीपासून भविष्यात मोठा बाका प्रसंग ओढवू शकतो अशी भीती दुकानदार आणि ग्राहक (Customer) व्यक्‍त करीत आहेत. या जीर्ण इमारतीची भक्‍कमपणे डागडुजी (repair) करावी किंवा या इमारतीच्या जागी नव्याने प्रकल्प उभारणे आवश्‍यक असल्याचे मत काही दुकानदार व्यक्‍त करीत आहेत.

३५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८३ साली पालिकेतर्फे (Municipal Corporation) ही बाजार प्रकल्प इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर मिळून दुकाने, बॅंक, वीज खात्याचे संपर्क कार्यालय आणि अन्य आस्थापने आहेत. ही इमारत बरीच जुनी असल्याने ती जीर्ण झाल्याचे स्पष्ट आहे. या इमारतीचे छपरही बरेच कमकुवत झाले असून गेल्या सहा सात वर्षांपासून अधूनमधून छपराच्या स्लॅबचे कप्पे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. स्लॅबचे कप्पे कोसळून आतापर्यंत कोणताच अनुचित प्रकार घडला नाही, ही दुकानदार आणि ग्राहकांसाठी निश्‍चितच सुदैवाची बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीचे बांधकाम करताना छपरावरील काम व्यवस्थित करण्यात आलेले नाही. परिणामी पावसाळ्यात छपरावर गळणारे पावसाचे पाणी बऱ्याच ठिकाणी साचून राहते. हे पाणी स्लॅबमध्ये जिरत असल्याने छपराचा स्लॅब कमकुवत बनत चालला आहे अशी माहिती काही दुकानदारांकडून समोर आली आहे.

तात्पुरती दुरुस्ती ठरली कुचकामी

सहा-सात वर्षांपूर्वी या इमारतीच्या छपराच्या स्लॅबचे चार-पाच ठिकाणी कप्पे कोसळले होते. तत्कालीन पालिका मंडळाने त्याची तात्पुरती दुरुस्तीही केली होती. त्याचवेळी तत्कालीन पालिका मंडळाने छपराची नियोजनबध्दरित्या दुरुस्ती करायला हवी होती असे काही दुकानदारांचे म्हणणे आहे. गत पालिका मंडळाच्या कार्यकाळात तीन वर्षांपूर्वी स्लॅब कोसळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली होती. तेव्हाही पालिकेने तातडीने दुरुस्तीकाम हाती घेताना, स्लॅब कोसळलेल्या भागावर सिमेंटचा मुलामा काढला आहे.

या इमारतीतील धावस्कर ब्रदर्स दुकानासमोरील जोड भागाच्या खालच्या बाजूने अधूनमधून स्लॅबचे तुकडे पडत असतात. तसेच विरुध्द बाजूने डिचोली अर्बन बॅंकेच्या बाजूने वर चढण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्यांच्या जीन्याच्या खालच्या बाजूने तसेच विविध ठिकाणी अधूनमधून स्लॅब सुटत आहे. यावरून ही इमारत कमकुवत झाल्याचे स्पष्ट होत असून एखादेवेळी अनिष्ट घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तशी भीतीही दुकानदार आणि ग्राहक व्यक्‍त करीत आहेत.

इमारतीची स्थैर्यता तपासणे आवश्यक

दहा दिवसांपूर्वी डिचोली गट कॉंग्रेसतर्फे डिचोली पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांची भेट घेवून बाजार इमारतीची समस्या त्यांच्यासमोर मांडली होती. इमारत कमकुवत झाली असून पालिकेने या इमारतीची पाहणी करावी. या इमारतीची स्थैर्यता तपासून आवश्‍यक ती उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. या इमारतीची पाहणी करण्याची ग्वाही मुख्याधिकारी श्री. शिरगावकर यांनी त्यांना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT