third wave of covid-19 in goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाची तिसरी लाट; पॉझिटिव्हिटी रेट 31.84 टक्के

कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने नागरिकांनी गर्दी टाळून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने नागरिकांनी गर्दी टाळून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मात्र, कोरोना संबंधी कडक निर्बंध कायम असतानाही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल सक्रिय रुग्णांची संख्या 14 हजार 134 झाली आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट 31.84 टक्क्यांवर गेला आहे. (Latest News Update on Third Wave in Goa )

चोवीस तासात नवे 3 हजार 119 रुग्ण सापडले आहेत. तर दुसरीकडे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोरोना बाधितांचे अधिकच्या उपचारासाठी भरती होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रुग्णांवर उपचार करणारे 28 निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याची माहिती गार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रतिक सावंत यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, त्याला न जुमानता अनेक पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह घरोघरी प्रचार सुरू ठेवला आहे. त्यामुळे एखाद्या नेत्याला किंवा उमेदवाराला कोरोना झाल्याचे आढळून आल्यास त्याचा फटका त्याच्या समर्थकांनाही बसू शकतो. निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे उमेदवार व नेते हे जीव धोक्यात घालून प्रचार करत आहेत व त्याचबरोबर ते लोकांनाही धोक्यात घालत आहेत. दरम्यान, राज्यातील आरोग्य कर्मचारी, कोविड वॉरियर, फ्रंट लाईन वर्कर आणि 60 वर्षावरील आजाराने त्रस्त (कोमोरबीड) नागरिक बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. राज्यात असे सुमारे 28 हजार लोक आहेत त्यापैकी 4004 लोकांनी हा डोस घेतला आहे.

सर्दी तापाने नागरिक हैराण

कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग सुरू असताना अनेक जण सर्दी, खोकला आणि ताप या आजाराने त्रस्त आहेत. त्यातील बहुतांश जणांनी कोरोना चाचणी केली. परंतु, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, सध्या व्हायरल इन्फेक्शनचीदेखील साथ सुरू आहे.कोरोना नसला तरी आजारी व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपचार घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील निवडणूक (Election) घोषित झाली आहे, त्याचबरोबर कोरोना संसर्गाचे रुग्णही वाढत आहेत. प्रचारात झोकून दिल्याने काही नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, आम आदमी पक्षाचे संयोजक राहुल म्हांबरे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. सध्या ते गृह अलगीकरणात आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी 4:30 वा. पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील कोरोना संसर्गाबाबतची सद्यस्थितीची माहिती देणार आहेत. पंतप्रधान जे काही मार्गदर्शक तत्त्वांसंदर्भात सूचना करतील त्यानुसार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यासाठी निर्णय घेतला जाईल.

- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: चिठ्ठी, अंत्यसंस्कारासाठी पैसे अन् शांत निरोप; मोखर्डमध्ये 2 बहिणींचा हृदयद्रावक अंत, आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट

PM Kisan 24th Installment Date: कधी रिलीज होणार पीएम-किसानचा 24वा हप्ता? त्याआधी उरका 'ही' 3 महत्त्वाची कामे, अन्यथा...

Goa Rakshan Yatra: सोनिया, प्रियांका, राहुल गांधींसह खर्गेंना निमंत्रण; 40 मतदारसंघांतून 27 दिवस फिरणार काँग्रेसची 'गोवा रक्षण यात्रा'

Porvorim Traffic: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतुकीचा पेच सुटणार; 3 मार्गिकांचा पर्याय, आठवडाभरात नवी व्यवस्था लागू

Horoscope 22 Saptember 2026: परिवर्तिनी एकादशीचा महायोग! आज 'गजकेसरी योगा'मुळे पालटणार या राशींचे भाग्य; मिळणार बक्कळ यश आणि पैसा

SCROLL FOR NEXT