गुळेली : वाळपई -उसगाव भंडारी समाज समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, त्यात गोवा राज्यात येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री (CM) भंडारी समाजाचाच व्हावा, अशी मागणी उपस्थित सदस्यांतर्फे करण्यात आली. यासाठी सर्व समाज बांधवांनी एकजूटीने या एका विषयासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत यावेळी बहूतेक सदस्यांनी मांडले.
जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर नाईक म्हणाले की वाळपई मतदारसंघात (Constituency) आमच्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सत्यविजय नाईक आहेत त्यांच्या मागे आमच्या समाजाने व इतर समाजानेही ठामपणे उभे राहिले पाहिजे आणि त्यांचा विजय सोपा करण्यास मदत केली पाहिजे. आमच्या समाजातील अधिकाधिक लोकोंना विधानसभेत पोचवण्यासाठी प्रत्येक समाजबांधवने खारीचा वाटा उचलला पाहिजे असे ते म्हणाले.
गोमंतकाच्या कानाकोपऱ्यात भंडारी समाज विखुरलेला आहे, त्याचप्रमाणे इतर समाजापेक्षा लोकसंख्येच्या प्रमाणात भंडारी समाज पुढे आहे मात्र समाजावर आजही अन्याय होत आहे. तरुण पिढी बेरोजगार असून मानसिक तणाव खाली आहे. समाजाला ज्ञान, सत्ता, पैसा, प्रतिष्ठा यापासून आजही दूर ठेवण्यात आलेले आहे. यापुढे अन्याय सहन करणार नाही. या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केवळ भंडारी नव्हे तर इतर समाजानेही सहकार्य करावे. भंडारी समाजच इतर समाजालाही पुढे नेऊ शकतो. आजच्या घडीला भंडारी समाजाचे नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे, असे उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक यांनी यावेळी म्हटले.
सर्वप्रथम समितीचे अध्यक्ष विनोद नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी दहावी बारावी व समाजातील उच्च शिक्षित समाज बांधवांचा गौरव सोहळा व महिला साठी दरवर्षी प्रमाणे घेण्यात येणारा हळदीकुंकू समारंभ यावर चर्चा करण्यात आली. यात विनोद नाईक, चंद्रकांत नाईक, समाजातील जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर नाईक, बाबलो नाईक, निलेश नाईक, श्याम नाईक, राजेंद्र नाईक, राजेंद्र (भाई) नाईक, सुभाष नाईक, गजानन नाईक, महिला अध्यक्ष विंदा विठू नाईक आदी उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.