गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 100 आरोग्य कर्मचारी, डॉक्टर कोरोनाबाधित

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे.
Goa Medical College
Goa Medical College Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. चोवीस तासात नवे 3119 रुग्ण सप्पाडले आहेत. दरम्यान, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC) सुमारे 100 कर्मचाऱ्यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये वैद्यकीय सल्लागार, निवासी डॉक्टर, परिचारिकांचा समावेश आहे. परिणामी, राज्याच्या प्रमुख रुग्णालयाच्या कामकाजावर गंभीर ताण पडत आहे. (Goa Medical College COVID-19 Update)

Goa Medical College
मुख्यमंत्री भंडारी समाजाचाच हवा मागणीला जोर

एका वरिष्ठ जीएमसीच्या (GMC) डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी केल्या जाणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या उर्वरीत कर्मचाऱ्यांवर खूप ताण पडत आहे.

गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सचे अध्यक्ष डॉ प्रतीक सावंत म्हणाले की, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर पडल्यामुळे रुग्णालयात निवासी डॉक्टरांचा (Doctors) तुटवडा आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून 15 दिवसांचा अवधी आहे. ती पूर्ण झाल्यास आम्हाला नवीन निवासी डॉक्टर सामील होतील. तोपर्यंत यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती आम्हाला वाटते.

Goa Medical College
मुख्यमंत्री भंडारी समाजाचाच हवा मागणीला जोर

ओमिक्रॉन सामान्य सर्दी नाही

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीच्या आधारे भारतातील आरोग्य अधिकार्‍यांनी लोकांना ओमिक्रॉन (Omicron Variant) संसर्गाला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. ओमिक्रॉन सामान्य सर्दी नाही आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com