Goa Budget 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2025: याच वर्षी होणार गोव्यात तिसरा जिल्हा? मुख्यमंत्री सावंत यांची अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा

Goa Budget 2025-26: हिंदी कवितेद्वारे सुरुवात करत त्यांनी मराठी, कोकणी, इंग्रजीतून बजेटचे वाचन केले.

Pramod Yadav

Goa Budget 2025

पर्वरी: गोव्यात गेल्या अनेक दिवसांपासून तिसरा जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. तिसरा जिल्हा आकाराला आणण्याची प्रक्रिया वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्हा निर्मितीबाबत सर्व सोपस्कर यावर्षी पूर्ण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली.

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत २७,९९३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सावंत यांनी विविध खात्यांसाठी भरघोस तरतूद केली. सावंत यांनी यावेळी तिसऱ्या जिल्ह्याचा देखील उल्लेख केला. तिसरा जिल्हा निर्मितीबाबत सर्व सोपस्कर यंदा पूर्ण केली जाईल, असे सावंत यांनी घोषणा केली. दरम्यान, सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर याच वर्षी राज्यात तिसरा जिल्हा आकाराला येण्याची शक्यता आहे.

फोंडा, धारबांदोडा, सांगे, केपे व काणकोण तालुक्यांचा मिळून तिसरा जिल्हा स्थापन केला जाऊ शकतो. दरम्यान, यातून  फोंडा तालुका वगळ्याचे राजकारण सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या जिल्ह्याची मागणी करणाऱ्या मंत्री रवी नाईक यांचाच तालुका यातून वगळला जाण्याबाबत राजकीय तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

विशेष पेन्शन योजना

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास पेन्शन योजना सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन मिळावी यासाठी 'युनिफाइड पेन्शन स्कीम' सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांची ससेहोलपट होऊ नये यासाठी आम्ही ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन, ग्रॅज्युइटीसह इतर लाभ विना विलंब देण्यात येणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'व्होट चोरी'चा आरोप

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT