Goa Budget 2025: सरपंच, पंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या वेतनात वाढ; गोवा अर्थसंकल्पातील 10 महत्वाच्या तरतूदी

Goa Budget 2025-26: गोव्यात तिसरा जिल्हा निर्मितीचे सोपस्कार यंदा पूर्ण करणार.
Goa Budget 2025 Live Update
Goa Budget 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Budget 2025

गोव्यासाठी वर्षे २०२५-२६ या वर्षासाठीचा २८,१६२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केला. मुख्यमंत्री सावंत यांनी हिंदी कविता सादर करत सलग सादव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. सावंत यांनी विविध मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या.

१) मडगावातील दिंडी आणि लईराईच्या जत्रेला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याची घोषणा सावंत यांनी केली.

२) राज्यातील रस्त्यांची कामे आणि दुरुस्तीसाठी १२०८ कोटी रुपयांची तरतूद, रस्ते खोदण्यासाठी पुढील पाच वर्षे बंदी

३) गोवा सरकारने पिण्याचे पाणी (DWD) हे नवे खाते निर्माण करण्याता आले असून, यासाठी ८०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पांचे काम लवकर पूर्ण होणार.

Goa Budget 2025 Live Update
Goa Budget 2025: फोंड्यात छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय उभारण्यात येणार; गोवा सरकारची पर्यटनासाठी भरघोस तरतूद

४) गोव्यासाठी महत्वाचा असणारा आणि वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण असणारा तमनार प्रकल्प यावर्षी लोकार्पण होणार असल्याची सावंत यांची घोषणा.

५) नार्वे येथे अध्यात्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाणार असून, येथे गंगा आरती स्थळाची स्थापना केली जाणार आहे. तसेच, किटला येथे स्काय डायविंग, हवाई क्रिडा अशा साहसी खेळासाठी सुविधा निर्माण करणार

६) फुफ्फुसाच्या कॅन्सरची चाचणी करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. गोमेकॉसाठी ९९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

७) खाण खात्याकडून २४ लीज असलेल्या १२ ब्लाॉकचा लिलाव करण्यात आल्याची माहिती. आणखी ९ लीजच्या लिलावाची प्रक्रिया लवकर सुरु होणार.

Goa Budget 2025 Live Update
Goa Budget 2025: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! युनिफाईड पेन्शन योजना सुरु करण्याचा घेतला निर्णय

८) सरपंचांचे मानधन दोन हजार तर पंचांचे मानधन एक हजार रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव तर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन १ हजार रुपयांनी वाढणार.

९) गोव्यात तिसरा जिल्हा निर्मितीचे सोपस्कार यंदा पूर्ण करणार.

१०) सरकारी कामकाजात कोकणीचा वापर वाढवण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा. पत्रकार घडवण्यासाठी महाविद्यालयांत जर्नालिझम क्लब स्थापन करणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com