Mapusa Municipal Council | Shubhangi Vayangankar Priya Mishal Nutan Bicholkar Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: म्हापसा नगराध्यक्षपदासाठी 'ही' दोन नावे चर्चेत...

Akshay Nirmale

Mapusa Municipal Council: सत्ताधारी नगरसेवकांच्या वाढत्या दबाव तंत्रामुळे म्हापसा पालिका नगराध्यक्ष पदाचा शुभांगी वायंगणकर यांनी राजीनामा दिला आणि सत्ताबदलाच्या या नाराजीनाट्यास अखेर पूर्णविराम मिळाला. वायंगणकरांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र पालिका प्रशासक संचालकांकडे बुधवारी सुपूर्द केले.

या राजीनाम्यानंतर महिलांसाठी आरक्षित असलेल्या म्हापसा नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत शहरात उत्सुकता आहे. सध्या प्रभाग दहाच्या नगरसेविका प्रिया मिशाळ यांचे नाव आघाडीवर आहे. तर प्रभाग सहाच्या नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांचेही नाव चर्चेत असले तरी पाच महिन्यांपूर्वीच बिचोलकर यांचा विरोधी गटातून सत्ताधारी गटात म्हणजे भाजपात प्रवेश केलाय. तसेच बिचोलकर या पक्षात नवीन असल्याने मिशाळ यांची अगोदर नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची अधिक शक्यता आहे. मिशाळ यांच्या नावास स्थानिक आमदारांचे समर्थन असल्याचे सूत्रांकडून समजते.

उपलब्ध माहितीनुसार, शुभांगी वायंगणकर यांनी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरुन पायउतार व्हावे यासाठी सत्ताधारी पालिका मंडळातील नगरसेवकांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. चार महिन्यांपासून शुभांगी वायंगणकर या राजीनामा देणार अशा बातम्या शहरात रंगल्या होत्या. अखेर बुधवारी (ता. 11) वायंगणकरांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

भाजपप्रणित आघाडीने म्हापसा पालिकेवर सत्ता स्थापन केल्यानंतर सत्ताधारी गटात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही पदे विभागून घेण्याचे ठरलेले. प्रत्येकास वर्षभराचा कार्यकाळ असेल. त्यानुसार शुभांगी वायंगणकरांची मुदत ही जून 2022 मध्ये संपुष्टात आलेली.

27 मे 2021 रोजी नगराध्यक्ष म्हणून वायंगणकरांकडे पक्षाने नेतृत्व सोपविले होते. भाजपा प्रणित आघाडीस पालिका निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे विरोधी पॅनलमधील शुभांगी वायगणकर यांच्यासमवेत चार नगरसेवकांना या सत्ताधार्‍यांनी आपल्या गटात समाविष्ट करुन घेत पालिका मंडळावर सत्ता स्थापित केली होती.

अलिखित करारनुसार आता उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर हे देखील काही दिवसांनंतर पदावरुन स्वतःहून पायउतार होतील. त्यानुसार नगरसेवक विराज फडके किंवा नगरसेवक सुशांत हरमलकर यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT