राज्यातील जमीन हडप प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आहे. कळंगुट येथील सर्वे क्रमांक 24/5 व 24/2 मधील डेब्रा मास्कारेन्हस गोईश परेरा ऊर्फ डेब्रा फातिमा ओलिव्ह मास्कारेन्हस यांची जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने मोहम्मद सुहेलला पाचव्यांदा अटक केली होती.
मोहम्मद सुहेल याचा राज्यातील बहुतेक जमीन हडप प्रकरणांमध्ये लागेबांधे आहेत. डेब्रा मास्कारेन्हस गोईश परेरा यांनी दिलेल्या तक्रारीत बार्देश येथील उपनिबंधक कार्यालयात जाऊन त्यांच्या जमिनीची चौकशी करून माहिती घेतली असता, त्यांच्या जमिनीची विक्री झाली असल्याचे उघडकीस आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.