Sanquelim Municipal Election
Sanquelim Municipal Election Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Election 2023: साखळी नगरपालिकेसाठी भाजपचे 'हे' आहेत उमेदवार

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Municipal Election 2023: साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी साखळी भाजप मंडळाने आपल्या 12 पैकी 10 प्रभागांमधील आपले सर्व उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा केली.

यावेळी मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर व इतरांची उपस्थिती होती.

प्रभाग-१ मध्ये यशवंत माडकर, प्रभाग-२मध्ये निकिता नाईक, प्रभाग -३मध्ये सिद्धी पोरोब, प्रभाग-४मध्ये रश्मी देसाई, प्रभाग-६मध्ये विनंती पार्सेकर, प्रभाग -७मध्ये ब्रह्मानंद देसाई, प्रभाग-९मध्ये दयानंद बोर्येकर,

प्रभाग-१०मध्ये आनंद काणेकर, प्रभाग-११मध्ये दीपा जल्मी व प्रभाग-१२मध्ये अंजना कामत. प्रभाग- ८ मध्ये बिनविरोध निवडून आलेले रियाझ खान हे भाजप पॅनलचे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपचे साखळीतील खाते हे यापूर्वीच खोलले गेलेले आहे.

ट्रिपल इंजिन सरकारची संधी द्या!

फोंडा व साखळी येथील निवडणूक प्रचाराला वेग आलेला आहे. साखळीत एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला असल्याने भाजपच्या विजयाची नांदी झाली आहे. इतर दहा उमेदवारही निवडून येणार अशी खात्री आहे.

मुख्यमंत्री साखळीचे असल्याने सर्व उमेदवार निवडून येतील. केंद्रात व राज्यातील डबल इंजिनच्या सरकारमुळे मोठी कामे झालेली आहेत, त्याचप्रमाणे साखळीत नगरपालिकेवर सत्ता आणून ट्रिपल इंजिनचे सरकार चालविण्याची.

संधी साखळीवासीयांनी या सरकारला द्यावी, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले.

काँग्रेस कार्यकर्ते भाजपबरोबर

भाजपने साखळी मतदारसंघात आणि नगरपालिका क्षेत्रात सत्ता नसतानाही केलेल्या कामांतून आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. याच कामांवर विश्वास ठेऊन साखळीवासीयांनी भाजपच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवावा.

विरोधी काँग्रेस गट आज साखळीत राहिलेला नाही. त्यांच्याकडे उमेदवारच नसल्याने कुटुंबातील लोकांना अन्य प्रभागांमध्ये उतरविले आहे.

साखळीत काँग्रेसचे अस्तित्व राहिले नसल्याने आज त्यांचे कार्यकर्ते भाजपकडे येत आहेत, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

‘टुगेदर फॉर साखळी’चे पॅनल जाहीर

साखळी नगरपालिका निवडणुकीत भाजप गटाने आपले उमेदवारांचे पॅनल बुधवारी (ता.२६) सकाळी जाहीर केल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी टुगेदर फॉर साखळी गटाने आपल्या उमेदवारांचे पॅनल जाहीर केले.

टुगेदर फॉर साखळी पॅनलतर्फे प्रभाग-१मध्ये कुंदा माडकर, प्रभाग-२मध्ये ईशा सगलानी, प्रभाग-३मध्ये सुनीता वेरेकर, प्रभाग-४मध्ये धर्मेश सगलानी, प्रभाग-६मध्ये डॉ. सरोज देसाई, प्रभाग-७मध्ये संपतराव देसाई, प्रभाग-९मध्ये भाग्यश्री ब्लेगन,

प्रभाग-१०मध्ये राजेंद्र आमशेकर, प्रभाग-११मध्ये रश्मी घाडी व प्रभाग-१२ मध्ये आश्विनी कामत. प्रभाग ५ मध्ये प्रवीण ब्लेगन हे बिनविरोध निवडून आल्याने या पॅनलचे खाते नगरपालिकेत उखडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT