Goa Bank Fraud: मडगावात राष्ट्रीयीकृत बँकेला महिला कर्मचाऱ्याचाच गंडा, बनावट एटीएम कार्डद्वारे...

या महिलेला सहा महिन्‍यांची कैदेची शिक्षा आणि ३० दिवसांच्‍या बँकेला 3.75 लाख रुपये भरपाई देण्‍याचा आदेश दिला.
Bank Fraud
Bank FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bank Fraud: भलत्याच इसमाच्या नावावर एटीएम कार्ड तयार करून राष्‍ट्रीयीकृत बँकेत 3.75 लाखांची अफरातफर केल्‍याप्रकरणी बँकेच्‍या एका महिला कर्मचारी आरोपीला मडगाव न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

कोलवा पोलिस स्‍थानकाचे तत्‍कालीन पोलिस उपनिरीक्षक आनंद शिरोडकर यांनी या प्रकरणाचा तपास करून वार्का येथील संशयित महिला कर्मचारी हेलिसिया व्‍हिएगस (30) हिच्‍याविरुद्ध भादंसंच्‍या 409 तसेच 468 कलमांखाली गुन्‍हा नोंद करून न्‍यायालयात आरोपपत्र सादर केले हाेते.

सरकारी वकील जतीन ठक्‍कर यांनी या खटल्‍यात कोलवा पोलिसांतर्फे काम पाहिले. न्या. कार्लो सांतान दा सिल्‍वा यांच्‍या न्‍यायालयाने आरोपी महिलेला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या बाणावली शाखेचे तत्‍कालीन व्‍यवस्‍थापक सुदिन बोरकर यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. सरकार पक्षाने हा खटला न्‍यायालयात सिद्ध केला असल्‍याचे न्‍या. दा. सिल्‍वा यांनी निवाड्यात म्‍हटले आहे.

या गुन्‍ह्यासाठी या महिलेला सहा महिन्‍यांची कैदेची शिक्षा आणि 30 दिवसांच्‍या बँकेला 3.75लाख रुपये भरपाई देण्‍याचा आदेश दिला. बनावट कागदपत्रे तयार केल्‍याप्रकरणी या गुन्‍ह्यासाठी आणखी सहा महिन्‍यांची शिक्षा ठोठावली.

पहिली सहा महिन्‍यांची शिक्षा संपल्‍यानंतर दुसरी सहा महिन्‍यांची शिक्षा सुरू होणार आहे. भरपाईची एकूण रक्‍कम किंवा ती रक्कम न भरल्‍यास आणखी दोन महिन्‍यांची कैदेची शिक्षा भोगावी लागेल.

बनावट सहीने कार्ड

या प्रकरणातील संशयित महिला ही त्‍यावेळी या बँकेत कारकून म्‍हणून काम करत होती. या बँकेचे एक ग्राहक सावियो रुजारियो डिसिल्‍वा यांची एटीएम कार्ड रजिस्‍टरवर बनावट सही करून तिने एटीएम कार्ड तयार करून घेतले आणि अनेकदा या एटीएम कार्डद्वारे 3.75 लाखांची रक्‍कम काढली, असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com