Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

ED Panaji Action: व्यातील जमिनींचे बनावट व्यवहार करुन मूळ मालकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपली कारवाई अधिक तीव्र केली.
ED Panaji Action
Goa Land Grabbing CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील जमिनींचे बनावट व्यवहार करुन मूळ मालकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपली कारवाई अधिक तीव्र केली. ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने मोठी कारवाई करत इस्तेवान डिसूझा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सुरु असलेल्या मनी लाँड्रिंग तपासांतर्गत 6.27 कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या तीन स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या. ही कारवाई प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (PMLA), 2002 अंतर्गत करण्यात आली.

या प्रकरणाचा सखोल तपास केला असता असे समोर आले की, आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जमिनी बळकावण्याचे मोठे रॅकेट चालवले होते. इस्तेवान डिसूझा आणि त्यांच्या साथीदारांनी जमिनीच्या मूळ मालकांची बनावट कागदपत्रे तयार केली होती. इतकेच नाही तर, अनेक ठिकाणी मूळ मालकांचे सोंग घेण्यासाठी दुसऱ्या व्यक्तींना उभे करुन सरकारी यंत्रणांची दिशाभूल करण्यात आली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे मौल्यवान जमिनींची परस्पर विक्री करण्यात आली किंवा त्या बळकावण्यात आल्या. यातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा निर्माण करण्यात आला होता, ज्याचा तपास आता ईडी करत आहे.

ED Panaji Action
ED Raid Goa: जमीन हडप प्रकरण: 'मॉडेल्स' कंपनीवर ईडीचे छापे, दुबईतील मालमत्तेचे पुरावे जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, या विशिष्ट जमीन बळकाव प्रकरणाची व्याप्ती मोठी असून तपासाच्या विविध टप्प्यांवर आतापर्यंत अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ताज्या कारवाईसह या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तांचे बाजारमूल्य आता सुमारे 78.14 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. गोव्यासारख्या (Goa) राज्यामध्ये जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असताना अशा प्रकारे जमिनी हडपण्याचे प्रकार गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ईडीने उचललेले हे पाऊल भू-माफियांना मोठा इशारा मानला जात आहे.

ED Panaji Action
Goa Crime: वेफर्स-कॉफीच्या पाकिटातून कोकेन विक्री, आंतरराष्ट्रीय रॅकेटवर ED ची नजर; 43 कोटींच्या तस्करीप्रकरणी 7 जणांवर गुन्हा

या कारवाईमुळे गोव्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात आणि सरकारी महसूल विभागाशी संबंधित वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जमिनींच्या व्यवहारात पारदर्शकता राहावी आणि सर्वसामान्यांची फसवणूक थांबावी यासाठी या तपासातून हाती लागणारे पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ईडीने जप्त केलेल्या या मालमत्ता आता कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून कमावलेल्या पैशांचा मार्ग शोधण्यासाठी पुढील चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com