Ponda Municipal Election 2023: गावासारखाच भासणारा 'हा' प्रभाग आता विकासाच्या मार्गावर

पुनर्रचनेमुळे शहरी तोंडवळा : विकासाच्या मार्गावर; शांतीनगरचाही काही भाग जोडला
Ponda Municipal Election 2023
Ponda Municipal Election 2023Dainik Gomantak

Ponda Municipal Election 2023: जुन्या व नव्याचा संगम म्हणजे प्रभाग-14. दुर्गा भाट हा तसा फोंडा शहराचा पारंपरिक भाग; पण आता या दुर्गा भाटातील अंतर्गत भागही विकसित व्हायला लागला आहे. तळे हा असाच एक पूर्वी कोणाच्याही खिजगणतीत नसलेला भाग.

पण आता हाच भाग वेगाने विकसित होत आहे.विठोबा मंदिर व बाजारापासून बेतोडे वा बेळगाव हायवेवरून मडगावला जाण्याकरता तळे या भागाचा वापर केला जातो.

यामुळेच प्रभाग-14 चा हा भाग विकासाच्या मार्गावर आरुढ होताना दिसायला लागला आहे. या प्रभागाची सीमा ही बेतोडा पंचायतीला जाऊन मिळाली आहे.

पुनर्रचनेत आता या प्रभागाला शांतीनगरचाही काही भाग जोडलेला दिसतो आहे. त्यामुळे रांजगणसारखे पॉश वस्तीचे भागही या प्रभागात आले आहेत.

त्यामुळे गेल्या वेळेला ग्रामीण बाज असलेला प्रभाग आता काही भागात शहरी तोंडवळा घेऊन वावरताना दिसत आहे.

दुर्गा भाटपासून बाजारात येण्याकरता या भागातील रस्त्याचा वापर केला जातो. तळे भागात सदनिकांबरोबरच जुनी घरेही दिसतात.

पण शांतीनगर भागात मात्र नव्यानेच विकसित झालेल्या हाउसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि बंगल्यांचे जाळेच विणलेले दिसते.

शांतीनगरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या रुक्मिणी हॉलपासून या प्रभागातील शांतीनगर भागाची सुरवात होते व ती नंतर दुर्गा भाटातील तळे भागापर्यंत पोहोचते.

Ponda Municipal Election 2023
Goa Mining: राज्य सरकार अन् खाण कंपन्यांना खंडपीठाचा दणका!

आनंद नाईक हे या भागाचे विद्यमान नगरसेवक. गेल्या खेपेला त्यांनी याच प्रभागातून काँग्रेस पॅनलतर्फे अपक्ष अब्बास मुल्ला यांच्यावर 113 मतांनी विजय प्राप्त केला होता. आता ते दुसऱ्या वेळी रिंगणात उतरले आहेत.

गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांबद्दल विचारल्यावर त्यांनी विकासकामांची यादीच सादर केली. कृषिमंत्री रवी नाईक यांचे स्वीयसचिव असल्यामुळे ते विकासकामांबाबत वाकबगार असल्याचे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवले.

Ponda Municipal Election 2023
Goa Bank Fraud: मडगावात राष्ट्रीयीकृत बँकेला महिला कर्मचाऱ्याचाच गंडा, कार्डद्वारे लंपास केले...

1045 मतदार ठरवणार भविष्य

पुनर्रचित केलेल्या या प्रभागाचा फेरफटका मारल्यावर तळे व शांतीनगर भाग यामधला फरक अधोरेखित झाला.

तळे भागात काही जागांना पारंपरिक महत्त्व असल्यामुळे त्यांना अजूनही विकासाकरता वाव आहे तर दुसऱ्या बाजूला शांतीनगर भाग हा पूर्णपणे विकसित झालेला दिसतो आहे. यावेळी 1045 मतदार या प्रभागाचा भावी नगरसेवक कोण हे ठरवणार आहेत.

तिरंगी लढत होणार

यावेळी या प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. गेल्या वेळेला काँग्रेस पॅनलतर्फे लढलेले विद्यमान नगरसेवक आनंद नाईक हे यावेळी भाजप पॅनलतर्फे रिंगणात उतरले आहेत. त्यांना डॉ. केतन भाटीकरांच्या ‘रायझिंग फोंडा’ पॅनलच्या सूरज नाईक यांच्याशी सामना करावा लागत आहे.

नाईक हे मगोचे फोंडा मतदारसंघाचे गटाध्यक्ष असून गेल्यावेळी ते प्रभाग पाचमधून रायझिंग फोंडातर्फेच रिंगणात उतरले होते. अजित पारकर हे या लढतीचा तिसरा कोन आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com