Protest Against Bhoma Highway Dainik Gomantak
गोवा

Goa Highway: भोम महामार्ग रुंदीकरण; लोकांना विश्‍वासात घ्यावे

Goa Highway: सरकारला विनंती ः सुनील देसाईंचा पवित्रा भाजपला पचनी पडेल का?

दैनिक गोमन्तक

Goa Highway: भोम येथील महामार्ग रुंदीकरणाला सध्या मोठा विरोध होत आहे. लोकांची घरे न पाडता शाश्‍वत विकास हवा आहे, असे भाजप नेते सुनील देसाई यांनी सांगितले. राज्यभर अनेक ठिकाणी विकास होत आहे आणि आंदोलनेही सुरू आहेत, त्यामुळे सरकारने लोकांना विश्‍वासात घ्यावे, अशी देसाई यांनी विनंती केली आहे.

विविध राजकीय पक्षांनी येथील लोकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परंतु फोंड्यातील भाजपचे नेते सुनील देसाई यांनी भोम येथील महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला विरोध करण्यासाठी आयोजित सभेला रविवारी उपस्थिती लावली. त्यामुळे देसाई यांनी घेतलेली भूमिका पक्षाला कितपत पचनी पडणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

गोवा प्रदेश भाजपचे खजिनदार आणि ज्येष्ठ पदाधिकारी संजीव देसाई यांचे बंधू असलेले सुनील देसाई हे फोंड्यातील भाजपचा चेहरा म्हणून समजले जातात. २०१७ मध्ये फोंड्यातून भाजपच्या उमेदवारीवर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे मागील २०२३ च्या निवडणुकीत ते भाजपपासून अलिप्त राहिले. या निवडणुकीत त्यांनी ‘मगोप’ उमेदवार केतन भाटीकर यांना पाठिंबा दिला होता.

महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी भोम येथे रविवारी झालेल्या सभेत सुनील देसाई यांनी व्यासपीठावर हजेरी लावली. त्यांनी एनएच-४-ए च्याविरोधात असलेल्या लढ्याविषयी माहिती दिली. या लढ्याला भोम येथील लोक मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता. त्यावेळी विधानसभेवर मोर्चा काढण्याचे ठरले होते, तेव्हा विरोधी पक्षनेते असलेले मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला आत्मविश्‍वास मिळाला. तेव्हा अडीचशे लोकांचा मोर्चा काढण्यात आम्ही यशस्वी झालो.

पक्षाच्या पवित्र्याकडे लक्ष

दरम्यान, भाजपचे नेते सुनील देसाई यांनी घेतलेली भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना नक्कीच टोचणारी असणार आहे. त्याशिवाय त्यांनी या सभेला लावलेल्या उपस्थितीकडे फोंडा भाजप किंवा राज्य भाजप कार्यकारिणी कसे पाहतेय, ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT