There is attention on Congress candidates from Goa Forward activists Dainik Gomantak
गोवा

गोवा फॉरवर्ड कार्यकर्त्यांकडून काँग्रेस उमेदवार नजरकैदेत

हॉटेलमध्ये बस्तान: भाजपशी संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेसच्या उमेदवारांशी भाजप नेत्यांशी संपर्क होऊ नये, यासाठी त्यांना मडगावच्या हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. या उमेदवारांवर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी नजर ठेवली आहे.

कुडचडेचे उमेदवार अमित पाटकर यांचा वाढदिवस असून तो साजरा करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे काँग्रेसचे काणकोणचे उमेदवार जना भंडारी यांनी पत्रकारांना सांगितले. मंगळवारी या सर्व उमेदवारांना बांबोळी रिसॉर्टमध्ये ठेवले होते.

त्यावेळी त्यांनी आम्ही दिगंबर कामत यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो आहोत, असे कारण सांगितले होते. सध्या त्यांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले आहे, ते हॉटेल केपेचे काँग्रेस उमेदवार एल्टन डिकॉस्ता यांच्या मालकीचे असून उद्या मतमोजणीच्या वेळीही हे उमेदवार येथेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी काँग्रेसच्या काही उमेदवारांशी भाजप मंत्र्यांनी संपर्क साधला होता. त्या पार्श्वभूमीवर आता ही खबरदारी घेण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT