सत्तरीत राणे दाम्पत्याकडून काँग्रेसचा धुव्वा

वाळपईत विश्वजीत राणे, तर पर्ये मतदारसंघात दिव्या राणेंचा दणदणीत विजय
Vishwajit Rane wins in Valpoi
Vishwajit Rane wins in ValpoiDainik Gomantak

पणजी : सत्तरी तालुक्यात राणे दाम्पत्याने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. वाळपई मतदारसंघात विश्वजीत राणेंनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे, तर पर्ये मतदारसंघातून विश्वजीत राणेंच्या पत्नी दिव्या राणे यांनी आमदारकी मिळवली आहे. दोन्ही मतदारसंघात अगदी सहजपणे भाजपला विजय मिळाला आहे. विश्वजीत राणेंना यावेळी रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांनी कडवी टक्कर दिली आहे. मात्र अटीतटीच्या लढतीत विश्वजीत यांनी मनोज परब यांचा पराभव केला आहे.

Vishwajit Rane wins in Valpoi
पणजीत भाजपने गड राखला; उत्पल पर्रीकर पराभूत

वाळपई हा विश्वजीत राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. पर्ये मतदारसंघातून प्रतापसिंग राणे निवडणूक लढवत असल्याने विश्वजीत राणेंनी वाळपईलाच आपला गड बनवलं होतं. 2012 आणि 2017 साली मोठ्या मताधिक्याने विश्वजीत राणेंनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2017 साली भाजपच्या (BJP) सत्यविजय नाईक यांचा विश्वजीत राणेंनी पराभव केला होता. विश्वजीत राणेंनी ही निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती. मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपकडून निवडणूक लढवली होती. विश्वजीत यांना 2017 मध्ये 13493 मतं मिळाली होती, त्यांनी सत्यविजय नाईक यांचा 5678 मतांनी पराभव केला होता.

तर 2012 साली विश्वजीत राणेंनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक (Goa Election) लढवत भाजपच्या सत्यविजय नाईक यांचा 2939 मतांनी पराभव केला होता. विश्वजीत यांना 12412 मतं मिळाली होती.

Vishwajit Rane wins in Valpoi
मडगावात दिगंबर कामतांकडून बाबू आजगावकरांचा दारुण पराभव

दरम्यान पर्ये मतदारसंघात पहिल्याच फटक्यात दिव्या राणेंनी विजय मिळवला आहे. पर्ये हा राणे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे याच मतदारसंघातून काँग्रेसचं प्रतिनिधीत्व करत होते. मात्र यावेळी भाजपने त्यांची सून आणि विश्वजीत राणे यांची पत्नी दिव्या राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने प्रतापसिंग राणेंनी निवडणुकीतून माघार घेतली होती. प्रतापसिंग राणेंनी कुणाचाही प्रचार करणार नसल्याचं सांगितल्याने दिव्या राणेंना त्यांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला होता, त्यामुळे दिव्या राणेंचा विजय निश्चित मानला जात होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com