Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: काही पोलिस उपअधीक्षक पदे रिक्त राहण्याचीच शक्यता

Goa Police: भरतीपूर्व चाचणीत 28 पदांसाठी केवळ 89 पात्र

दैनिक गोमन्तक

Goa Police: पोलिस उपअधीक्षक पदाची 28 पदे भरण्यासाठी गोवा लोकसेवा आयोगाने प्रक्रीया सुरू केली असली तरी त्यापैकी काही जागा रिक्त राहतील, असे आज स्पष्ट झाले. 28 जागांसाठी सरासरी 3 उमेदवार असे चित्र आहे. अद्याप शाररिक चाचणी, लेखी परीक्षा आणि तोंडी मुलाखत व्हायची आहे.

आयोगाने ही पदे भरण्यासाठी घेतलेल्या भरतीपूर्व चाचणीत आता केवळ 89 जणच पात्र ठरले आहेत. काल दुसऱ्यांचा घेतलेल्या भरतीपूर्व चाचणीला 4 उमेदवार गैरहजर राहिले. सर्वसाधारण गटातील दोन, आदिवासी गटातील 1 तर इतर मागासवर्गीय गटातील एका उमेदवाराचा यात समावेश आहे. यामुळे 28 पदांच्या भरतीसाठी 89 उमेदवार पात्र ठरले आहेत.

त्यांना आता शाररिक पात्रता चाचणीस सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना लेखी परीक्षा आणि तोंडी मुलाखतीस सामोरे जावे लागणार आहे. एकूण पदे 28, अर्जदार 2468 आणि उत्तीर्ण केवळ 89 हे चित्र आहे. पोलीस उपाधीक्षक पद भरतीतील व लोकसेवा आयोगाने भरतीपूर्व चाचणी घेतली यात हे चित्र समोर आले आहे.

नियमानुसार या भरतीपूर्व चाचणीस पाच टक्के कमी गुण पडलेल्या ३७ उमेदवारांना काल भरतीपूर्व चाचणी देता आली. त्यावेळी ४ उमेदवारांनी दांडी मारली. आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात भरतीपूर्व चाचणीसाठी 2 हजार 350 जणांनी तयारी दाखवली होती.

प्रत्यक्षात 1 हजार 866 जण या भरतीपूर्व चाचणीसाठी आले. त्यापैकी पहिल्या प्रयत्नात 58 जण उत्तीर्ण झाले असून 31 जण दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य सरकार पंचवीस वर्षानंतर उपअधीक्षक पदाची ही पदे थेट भरतीने भरत आहे. उपअधीक्षक पदाची 62 पदे आयोगाच्या माध्यमातून सरकारने भरण्याचे ठरवलेले आह त्यापैकी 27 पोलीस निरीक्षकांना बढती देऊन पदे भरण्यात आली. हंगामी बढती दिलेल्या दहा जणांना सामावून घेण्यासाठी थेट भरतीतील दहा पदे तिकडे वळवण्यात आलेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT