Margao Municipal Council Gomantak Digital Team
गोवा

Margao Municipal Council: मडगाव पालिकेच्या ड्रॉवरमधून दिवसाढवळ्या गायब झाली इतकी रक्कम; सीसीटीव्ही कॅमेराही बंद

मडगाव नगरपालिकेच्या करवसुली ड्रॉवरमधून सोमवारी दिवसाढवळ्या 50 हजारांची रोकड गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Kavya Powar

Theft in Margao Municipal Council: गोव्यात चोरी होण्याच्या घटनांमध्येच अशी एक घटना समोर आली आहे ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मडगाव नगरपालिकेच्या करवसुली ड्रॉवरमधून सोमवारी दिवसाढवळ्या 50 हजारांची रोकड गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेबाबत मडगाव पालिकेने पोलिसात तक्रार दिली आहे. वरिष्ठ अधिकारी अभय राणे म्हणाले की ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोपो कलेक्शन गायब झाल्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. याबाबत सीसीटीव्ही तपासले आहेत. पण संबंधित सीसीटीव्ही कॅमेरा काम करत नसल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत माजी अध्यक्षा पूजा नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, कर आकारणीच्या व्यस्त विभागातून 50 हजार कर दिवसाढवळ्या चोरी होतो ही अतिशय लाजिरवाणी आणि धक्कादायक बाब आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होऊन चोराला लवकरात लवकर पकडण्यात यावे.

अभय राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर संबंधित सीसीटीव्ही तपासण्यात आले. पण तो बंद असल्याचे समजले. पण दुसऱ्या सीसीटीव्हीमधून एक संशयित व्यक्ती दिसल्यामुळे चौकशीला एक दिशा मिळू शकते, मात्र याबाबत अद्याप खात्री नसल्याने त्याला पकडण्यात आले नाही. पोलीस या चोराचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT