Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: पिळये-धारबांदोडा भूमिका मंदिरात चोरी

पिळये-धारबांदोडा येथील भूमिका देवीच्या मंदिरात काल रात्री चोरट्यांनी चोरी करून सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

दैनिक गोमन्तक

Goa News: पिळये-धारबांदोडा येथील भूमिका देवीच्या मंदिरात काल रात्री चोरट्यांनी चोरी करून सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

चोरट्यांनी ही चोरी करताना मंदिरातील साहित्याची नासधूस केली. फंडपेटी फोडली, मंदिरातील समया चोरल्या, सीसीटीव्ही कॅमेरा लंपास करण्याबरोबरच या कॅमेऱ्याच्या साहित्याचीही मोडतोड केली.

फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील पिळये येथील या मंदिरात रात्रीच्यावेळी कुणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरी केली.

चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्हीची यंत्रणा तोडून टाकली व साहित्याची नासधूस केली.

मंदिरातील कपाटात असलेल्या समया तसेच इतर पूजेचे साहित्य पळवून नेले. सकाळी देवालयात स्वच्छता करण्यासाठी आलेल्याच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने लगेच देवस्थानच्या अध्यक्षांना कळविले. त्यानंतर फोंडा पोलिसांना या चोरीची माहिती देण्यात आली.

मंदिरातील फंडपेटीचे कुलूप तोडून आतील सुमारे एक ते दोन हजार रुपये पळविले असावेत, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

या मंदिराचा नुकताच कालोत्सव झाल्यानंतर फंडपेटीतील पैसे समितीने काढले होते. त्यामुळे चोरांना मोठा डल्ला मारता आला नाही. फोंडा पोलिसांना या चोरीची माहिती दिल्यानंंतर पोलिसांनी मंदिरात धाव घेऊन पाहणी केली व तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim: गजेश नाईक दोन पिढ्यांपासून बनवतात घुमट, शामेळ; गणेशचतुर्थीत आरती पथकांकडून वाद्यांना मोठी मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; ते 'सायब' खरेच निवडणुकीत उतरणार ?

क्रीडा विश्वात शोककळा, ऑलिंपिक पदक विजेत्या दिग्गज खेळाडूचं निधन; अशी होती त्यांची कारकीर्द

Horoscope: नोकरीत यश, अडकलेले पैसे परत; शनी-बुधाच्या सम सप्तक राजयोगाने 'या 3' राशींना मिळणार बंपर फायदा

Mapusa: म्हापसा पालिकेचं सभागृह 'स्वातंत्र्यदिन समूहगीत' स्पर्धेसाठी पडले अपुरे, ढिसाळ नियोजनमुळे शिक्षकांत नाराजी

SCROLL FOR NEXT