GMC Medicine Shortage: गोमेकॉ रुग्णालयामध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा

द्ध आणि सतत औषध घेणाऱ्या रुग्णांची परवड सुरू आहे. याबाबत आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Medicine Shortage
Medicine ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

Medicine Shortage at GMC Hospital: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (गोमेकॉ) बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) संबंधित विभागांमधून तीन महिन्यांची औषधे लिहून दिली जातात.

मात्र, प्रत्यक्षात रुग्णालयाच्या औषधालयामधून केवळ एक महिन्याची औषधे दिली जातात. याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

यामुळे वृद्ध आणि सतत औषध घेणाऱ्या रुग्णांची परवड सुरू आहे. याबाबत आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामागे औषधांचा तुटवडा आहे की अन्य काळेबेरे? याबाबतही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गोमेकॉच्या रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात प्रामुख्याने वृद्ध आणि सतत औषध घेणाऱ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. प्रामुख्याने वृद्ध रुग्णांना रक्तदाब (डायबिटीस), शुगर आणि ह्रदयरोग यावर दररोज आणि दीर्घकाळ औषध घ्यावे लागतात.

Medicine Shortage
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरात किरकोळ घट; जाणून घ्या आजचे दर...

बहुतांश वेळा दर तीन महिन्यांनी ही औषधे त्या त्या रुग्णांकडून रुग्णालयाच्या संबंधित विभागातील डॉक्टरकडून लिहून (प्रिस्क्राइब) औषधालयामधून घेतली जातात. या रुग्णांना सातत्याने रुग्णालयात यावे लागू नये, याकरिता तीन महिन्यांची औषधे दिली जातात.

पण प्रत्यक्ष औषधालयामध्ये केवळ एक महिन्याची औषधे दिली जातात. नव्याने औषध घेण्यासाठी गेल्यास पुन्हा संबंधित विभागातील डॉक्टरांकडून औषधाची चिठ्ठी (डिस्क्रिप्शन) लिहून आणावे लागते.

यासाठी या वृद्ध नागरिकांना अनेक तास रांगेमध्ये उभारावे लागत असल्याने त्यांची परवड सुरू असून त्यांच्यात असंतोष पसरला आहे.

म्हणे, वरिष्ठांकडून सूचना!

‘गोमन्तक’कडे अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी संबंधितांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता आणि प्रत्यक्ष कार्यालयात भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ही माहिती मिळू शकली नाही.

मात्र, औषधालयाशी संपर्क साधला असता, आम्हाला वरिष्ठांकडून तशा सूचना आहेत असे सांगण्यात येत आहे. यामागे नक्की काय दडले आहे हे स्पष्ट होत नाही. यात रेशनच्या अन्नधान्य घोटाळ्याप्रमाणे काही घोटाळा आहे का? की औषधांचा तुटवडा आहे हे मात्र कळू शकले नाही.

औषधांबाबत ‘कॅग’चे ताशेरे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या औषध खरेदीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोना काळात खरेदी केलेल्या औषधाबाबत कॅगनेही आपल्या अहवालात रुग्णालयाच्या प्रशासनावर ताशेरे ओढले होते.

2018 नंतर गोवा अँटिबायोटिक फार्मास्युटिकल लिमिटेड आणि एका खासगी औषधालयाकडून सुरू असलेली खरेदी बंद केली आहे. सध्या संपूर्ण खरेदी एका खासगी कंपनीकडून केली जाते. डॉक्टरांची अंतर्गत एक समिती असून या समितीमार्फत ही औषधे खरेदी केली जातात.

अनेक वेळा ‘प्राधान्याने’ म्हणून औषधे खरेदी करून पुन्हा ही बिले सरकारला सादर केली जातात. ही औषधे निविदेशिवाय खरेदी केल्याने सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडतात.

Medicine Shortage
Goa News: गोवा खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निवाडा; व्‍यावसायिक उद्देशाने भाडेकरूला दिलेली मालमत्ता परत घेता येणार

प्रत्येक रुग्णाची एसओपी वेगळी : गोमेकॉच्या एका डॉक्टरांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की एकाच रोगाच्याबाबत प्रत्येक रुग्णाची स्वतंत्र आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला विविध औषधे दिली जातात.

काही ठराविक आजारांमध्ये तीन महिन्यांची औषधे लिहून दिली जातात. मात्र, औषधालयांमधून ती किती महिन्याची दिले जातात, याबाबत अधिकृत माहिती नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com