Theft in Chandreshwar Bhootnath Temple Goa:  Dainik Gomantak
गोवा

Goa Chandreshwar Temple: चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; दोन्ही सुरक्षारक्षक गैरहजर

सर्व रक्कम लंपास, चोरी सीसीटीव्हीत कैद

गोमंतक ऑनलाईन टीम

Theft in Chandreshwar Bhootnath Temple Goa: गेल्या रविवारी केपे बाजारात प्रवासी बसमध्ये चढताना दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरून नेल्या होत्या. हे प्रकरण ताजे असतानाच आज, सोमवारी आणखी चोरी उघडकीस आली आहे.

काल रात्री पर्वत परोडा येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानातील फंड पेटी फोडून त्यातील सुमारे दहा हजार रुपयांची रोकड अज्ञातांनी चोरून नेली.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री १२.३० ते २.३० च्या दरम्यान चोरी झाली असून मंदिराचा दरवाजा फोडून दोघा चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी फंड पेटी फोडून त्यातील रक्कम घेऊन पेटी मंदिराच्या पाठीमागील बाजूस टाकली.

आज सकाळी मंदिरातील बाहेरचे दिवे बंद करण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. तत्काळ पोलिसांना हा प्रकार कळविण्यात आला. दरम्यान, मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत.

मंदिराचे मुख्यत्यार पंडित देसाई यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे दोन आठवड्यापूर्वी ही फंड पेटी उघडून आतील पैसे काढले होते. सध्या त्या पेटीत दोन आठवड्याचे पैसे होते.

दरम्यान, मंदिरच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली असून ते काल रात्री कामावर आले नव्हते. चोरीचा शोध घेण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी दाखल केले होते. केपे पोलिसांनी चोरीचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT